🌟पुर्णा तालुक्यातील धार येथे उद्या ०८ एप्रिल रोजी हभप.अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे हरिकीर्तन....!


🌟तर आज रविवार दि.०७ एप्रिल रोजी रात्री हभप.ॲड यादव महाराज वाईकर यांचे जागराचे किर्तन होणार🌟

पुर्णा (दि.०७ एप्रिल) - पुर्णा तालुक्यातील धार येथे मागील सात दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताह चालू असून या सप्ताहात श्रीमद् भागवत कथा प्रवक्ते सोपान महाराज आहेरवाडीकर यांच्या रसाळ वाणीतून श्रीमद् भागवत कथा संपन्न झाली तसेच सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांची देखील कीर्तने झाली.

तर आज रविवार दि.०७ एप्रिल रोजी रात्री हभप.ॲड यादव महाराज वाईकर यांचे जागराचे किर्तन होणार असून उद्या सोमवार दि.०८ एप्रिल रोजी सकाळी किर्तन केसरी हभप.अच्युत महाराज दस्तापुरकर यांच्या कालाच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे तरी या किर्तन श्रवनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गोपाळ विठलराव पवार,श्री मारोती महादजी पवार,श्री ज्ञानोबा काशिनाथ पवार,समस्त गावकरी मंडळी धार यांच्या वतीने करण्यात आले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या