🌟परभणीत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत महायुतीचा संवाद महामेळावा संपन्न....!🌟परभणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी अकार्यक्षमच - कृषी मंत्री धनंजय मुंडे

परभणी (दि.१५ एप्रिल) :  परभणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी हे विकासाबाबत कायम उदासीन राहीले आहेत. या लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळेच परभणी जिल्हा हा सर्वांगीण विकासापासून सातत्याने कोसोदूर राहीला आहे अशी खंत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

           परभणी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ कृषी मंत्री मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील अक्षदा मंगल कार्यालयात काल रविवार दि.१४ एप्रिल २०२४ रोजी महायुती संवाद मेळावा आयोजित करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर, माजी मंत्री अर्जुन खोतकर,आमदार सौ.मेघना साकोरे-बोर्डीकर, आमदार बाबाजानी दुर्राणी, आ.डॉ.रत्नाकर गुट्टे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, माजी खासदार सुरेशराव जाधव, माजी आ. हरिभाऊ लहाने, माजी आमदार रामराव वडकुते, भाजप माजी महानगराध्यक्ष आनंद भरोसे, महानगर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, डॉ. केदार खटींग, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे यांच्यासह महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

          धनंजय मुंडे पुढे म्हणाले, काँग्रेसने ७० वर्षांत जेवढा विकास केला नाही तेवढा नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान काळात झाल्याचा दावा करत त्यांच्यामुळेच देशाची प्रतिष्ठा जगभरात वाढल्याचे त्यांनी सांगितले शासनाच्या विविध योजनांचे पैसे थेट गोरगरिबांसह शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मिळत आहेत. इंडिया आघाडी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करू शकली नाही यातच त्यांची हार आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.  

           परभणी जिल्ह्यात सुपीक जमीन गोदावरीवरील बंधार्‍यांमुळे उपलब्ध झालेले पाणी यामुळे वैभव टिकून आहे परंतु या वैभवाचा विकासात बदल झाला नाही. विकासावर कधीच निवडणूक झाली नाही असेही ते म्हणाले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या