🌟परभणी शहरात महात्मा ज्योतिबा फुले यांना विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनांकडून जयंती निमित्त अभिवादन.....!


🌟महायुतीच्या वतीने महायुतीच्या नेत्यांनी केले महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन🌟

परभणी (दि.११ एप्रिल) : परभणी शहरात आज गुरुवार दि.११ एप्रिल रोजी क्रांतीसूर्य राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या १९७ व्या जयंतीचे औचित्य साधून शासकीय अधिकारी/कर्मचारी तसेच विविध राजकीय पक्ष,सामाजिक संघटना व संस्था पदाधिकारी/कार्यकर्त्यांच्या वतीने महात्मा जोतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.

परभणी महानगर पालिकेच्या आयुक्त सौ.तृप्ती सांडभोर यांनी सकाळच्या सुमारास महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी भांडारपाल रामेश्‍वर कुलकर्णी,सांस्कृतिक विभागाचे प्रमुख राजकुमार जाधव हे उपस्थित होते पाठोपाठ सावता सेनेचे संस्थापक अध्यक्ष मुंजाजी गोरे, विठ्ठलराव यादव,राम जाधव,संतोष इखे,निळकंठराव हरकळ,अशोक गायकवाड,विष्णू थोरात,अ‍ॅड.रमेश गायकवाड, गणेश कटारे,सुभाष गायकवाड, बंडू मेहेत्रे,कृष्णा रासवे, सदानंद धामणे,रवि डुबे, साहेबराव जाधव आदी उपस्थित होते.

* महायुतीच्या वतीने महायुतीच्या नेत्यांनी केले महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन :-

              महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, भारतीय जनता पक्षाचे नेते डॉ. केदार खटींग, आयोजक अनिल गोरे, बंडू म्हात्रे, विष्णू थोरात, विश्‍वजित वाघमारे, शंकर भागवत, अर्जून काळे, सुरेश काळे, निरंजन गायकवाड, संदीप सोनटक्के, तुपसमिंद्रे, साहेब वैभव शिंदे, भगवान हरकळ, संतोष काळे, विठ्ठल काळे आदी उपस्थित होते.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या