🌟पुर्णा तालुक्यातील गौर येथे क्रांतिकारी मराठा योध्दा मनोज जरांगे यांच्या संवाद सभेला उस्फुर्त प्रतिसाद....!


🌟मराठ्यांनो राजकारण्यांच्या नादी लागू नका मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाला आवाहन🌟 

पुर्णा (दि.२१ एप्रिल) : पुर्णा तालुक्यातील गौर येथे शनिवार दि.२० एप्रिल २०२४ रोजी रात्री क्रांतिकारी मराठा योध्दा मनोज जरांगे याच्या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संवाद बैठकीत उपस्थित जनसमुदायासह उपस्थित मराठा तरुणांना संबंधित करतांना मनोज जरांगे म्हणाले की मराठ्यांनो राजकारणाच्या नादाला लागून आपल्या जीवनाचे वाटोळे करुन घेवू नका असे आवाहन त्यांनी केले.

              पूर्णा तालुक्यातील गौर या ठिकाणी आयोजित केलेल्या संवाद बैठकीप्रसंगी ते बोलत होते. जरांगे यांनी यावेळी आपल्या भाषणातून हजार, दोन हजारांसाठी या निवडणूकीत कोणाच्याही नादी लागू नका, राजकारणाच्या नादी लागून स्वतःचे वाटोळे करुन घेवू नका, असे आवाहनही केले. मराठा आरक्षणासाठीच्या संघर्षास मराठ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. तो प्रतिसाद ऐतिहासिक राहिला. मराठा समाज त्यातून एक झाला, ती एकजूट आता महत्वाची आहे. आरक्षणासाठी सगे सोयर्‍याच्या अधिसूचनेची अंमलबजावनी करण्याकरीता निर्णायक लढाईची गरज आहे. तो लढा आपण सर्वजण एकमुखाने लढू, आपल्याविरुध्द अनेक षडयंत्र झाले. परंतु, आपण ते हाणून पाडले. आपण कधीही मागे हटलो नाही. मरेपर्यंत हटणारही नाही, असेही ते म्हणाले. 

    बीड जिल्ह्यातील नारायण गढ या ठिकाणी दि.०८ जुन २०२४ रोजी सभा होणार आहे. त्यासाठी ९०० एक्कर जमीनीवर सभेच्या दृष्टीने सर्वतोपरी नियोजन केले जाणार आहेत. मराठा बांधवांची ही सभा रेकॉर्डब्रेक व ऐतिहासिक व्हावी या दृष्टीकोनातून सर्व प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे मराठा बांधवांनी सतर्क रहावे, जागरुक रहावे, सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी केल्याशिवाय कोणीही शांत बसू नये, असे आवाहनही जरांगे यांनी केले.

               दरम्यान, सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने जरांगे यांचे पूर्णा शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात आले. पूर्णा टी पॉइंट, देवगाव फाटा, एरंडेश्‍वर, कात्नेश्‍वर, माटेगाव तसेच नांदेड रस्त्यावरील चुडावा भागातही त्यांचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यावेळी महिलांनी त्यांचे औक्षण केले. एक मराठा लाख मराठा या घोषणांनी संवाद सभास्थान व स्वागत स्थान दुमदुमले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या