🌟वाघाळा ग्रामपंचायतीच्या स्थुत्य उपक्रमाचा प्रारंभ : ग्रामस्थांना अवघ्या ०५ रुपयात मिळणार आरओचे २० लिटर थंड पेयजल...!


🌟योजनेचा शुभारंभ गावचे प्रतिष्ठीत नागरीक तथा चेअरमन गणेश पाटील घुंबरे यांच्या हस्ते ग्रामस्थांच्या उपस्थितीत सुरू🌟

प्रतिनिधी

पाथरी :- पाथरी तालुक्यातील वाघाळा ग्रामस्थांना अगदी माफक दरात आरओचे शितल जल अगदी पाच रुपयात वीस लिटर शुद्ध पाणी पुरवठ्याची योजना गुढी पाडव्याच्या पावन पर्वावर नविन मराठी वर्षांच्या प्रारंभी सरपंच बंटी पाटलांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा शुभारंभ गावचे प्रतिष्ठीत नागरीक तथा चेअरमन गणेश पाटील घुंबरे यांच्या हस्ते ग्रामस्थांच्या उपस्थितीत सुरू झाले.

अगदी पाणी टंचाईच्या काळात ही योग्य नियोजनाने वाघाळा ग्रामस्थांना दोन टप्यात रोटेशन नुसात तीन पाणी पुरवठ्याच्या जलकुंभातून एक दिवस आड भरपुर प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यातच नागरीकांना अल्प दरात आरओचे शुद्ध थंडगार पाणी मिळावे या साठी सरपंच बंटी पाटील याचे प्रयत्न होते. मागिल महिण्यात या साठीची यंत्र सामुग्री खरेदी करून गावातील जनावराच्या शासकीय उपकेंद्रातील इमारतीत आरओची यंत्रणा बसवली गेली. सोमवार ९ एप्रिल रोजी चेअरमन गणेशराव घुंबरे पाटील यांच्या हस्ते आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत या शितल शुद्ध पेयजलाचे लोकार्पण गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर संपन्न झाले. वाघाळा ग्रामस्थां सह या मार्गावरुन जाणा-या प्रवाशांना ही अगदी पाच रुपयात विस लिटर पाणी मिळणार आहे. ही यंत्रना मानव रहित असून पाच रुपयांचा बंदा मशीन मध्ये टाकल्यास चोविस तास विस लिटर पाणी घेता येणार आहे. येत्या काही महिण्यात नविन पाणी पुरवठ्याच्या पाणी टाकीचे काम ही पुर्णत्वास जाऊन पुढील अनेक वर्षाचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे सरपंच बंटी पाटील यांनी सांगितले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या