🌟जळगाव जिल्ह्यातील जेष्ठ नेते खान्देशची बुलंद तोफ एकनाथ खडसे यांनी दिले घरवापसीचे स्पष्ट संकेत....!


🌟माझा पक्षप्रवेश दिल्लीत....लवकरच मिळणार तारीख : एकनाथ खडसेंनी दिली ची माध्यमांना माहिती🌟

जळगाव (दि.०७ एप्रिल) : खान्देशची बुलंद तोफ तथा जळगाव जिल्ह्यातील जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी घरवापसीचे स्पष्ट संकेत दिले असून लवकरच ते पुन्हा भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत या संदर्भात प्रसार माध्यमांशी बोलतांना एकनाथ खडसे म्हणाले की माझा भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश हा दिल्लीला होणार असून त्याकरिता पक्षप्रवेशासाठी लवकरच तारीख दिली जाणार आहे. त्या तारखेला मी पक्षप्रवेश करणार आहे. मी भाजपमध्ये ४० वर्षे काम केले आहे. पायापासून कळस मी उभारला आहे. त्यामुळे भाजपमधील काही वरिष्ठ सहकाऱ्यांनी माझ्याशी चर्चा केली त्यानंतर कुठल्याही अटी शर्ती न ठेवता मी भाजपामध्ये परत जात आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या