🌟कोल्हापूर पोलिस दलाच्या ताब्यातून पोबारा केलेला संघटीत गुन्हेगारी कायद्यातील (मकोका) आरोपी अखेर जेरबंद...‌.!


🌟नांदेड जिल्ह्यातील पोलिस मित्रांच्या सहकार्याने अवघ्या काही तासांतच सोनखेड पोलीस स्थानकाच्या हद्दीतून घेतले आरोपीला ताब्यात🌟 

नांदेड (दि.०८ एप्रिल) नांदेड जिल्ह्यातील सोनखेड पोलीस स्थानकाच्या हद्दीतून कोल्हापूर-चंद्रपूर असा प्रवास करीत असतांना कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यातील महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यातील (मकोका) अटक आरोपी कोल्हापूर पोलिस दलाच्या हातावर तुरी देऊन सोनखेड पोलीस स्थानकाच्या हद्दीत पळून गेल्याची घटना आज सोमवार दि.०८ एप्रिल २०२४ रोजी मध्यरात्री ०३-०० ते ०४-०० वाफेच्या सुमारास घडल्याने कोल्हापूर पोलिसांची अक्षरशः भंबेरी उडाली होती परंतु मकोका नांदेड पोलीस मित्रांनी प्रसंगावधान राखून कोल्हापूर पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करीत काही तासातच मकोकातील आरोपी पकडून परत कोल्हापूर पोलिसांच्या स्वाधीन केल्याने कोल्हापूर पोलिसांच्या जिवात जीव आला.

या संदर्भात सविस्तर वृत्त असे की कोल्हापूर येथील पोलीस पथक महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यातील (मकोका) ०४ आरोपी घेऊन कोल्हापूर ते चंद्रपूर असा प्रवास करत असताना नांदेड जिल्ह्यातील सोनखेड जवळ बराच रस्ता एक मार्गी असल्यामुळे आहे या एकमार्गी रस्त्यावर प्रत्येक वाहनं सामान्य वेगापेक्षा अत्यंत कमी वेगात चालवावी लागतात त्यामुळे नेमका या गोष्टीचा फायदा घेऊन कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यातील चार आरोपीं मधील एक आरोपी नामें विशाल उर्फ अनिल बाळासाहेब रुपनर हा पोलीस वाहनांचा दरवाजा उघडून कोल्हापूर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चालत्या वाहनातून पळून गेल्याचा भयंकर सघटनाक्रम आज सोमवार दि.०८ एप्रिल रोजी मध्यरात्री ०३-०० ते पहाटे ०४-०० वाजेदरम्यान घडला. घटनेची माहिती मिळतात नांदेड जिल्हा पोलीस दलातील अधिकारी/कर्मचारी तसेच सोनखेड पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने यांनी तात्काळ शोध मोहीम हाती घेतली दरम्यान मडकी कलंबर शिवारातील मडकी येथील सरपंचांनी या आरोपी बद्दल नांदेड पोलीस दलाला सविस्तर माहिती दिली यावेळी सरपंच यांनी कोल्हापूर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेला मकोकातील आरोपी विशाल उर्फ अनिल बाळासाहेब रुपनर याला गोड गोड बोलत आपल्याच आखाड्यावर थांबवून ठेवले व या संदर्भात सविस्तर माहिती पोलिसांना दिली यावेळी तात्काळ पोलिस त्याठिकाणी पोहोचले आणि पळून गेलेल्या विशाल उर्फ अनिल बाळासाहेब रुपनर यास ताब्यात घेतले असून मकोका सारख्या गंभीर गुन्ह्यातील पळून गेलेल्या आरोपीचा शोध लावण्यात नांदेड पोलिसांना पोलीस मित्रांमुळेच अवघ्या काही तासातच यश मिळाले.

नांदेड जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे,अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी आरोपीला पकडण्यासाठी मेहनत घेणाऱ्या पोलीस मित्रांचे आणि पोलिसांचे कौतुक केले आहे. नागरिक सुद्धा बिना गणवेशाचे पोलिसास आहेत त्यांनी मदत केल्याशिवाय पोलीस दल आपले काम योग्य रीतीने पूर्ण करू शकत नाहीत याचा प्रत्यय या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आला असून मकोका सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यात महत्त्वपूर्ण काम करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, पोलीस अंमलदार सुनील दोसलवार, केशव मुंडकर,गणेश सांजुरे, लोभाजी वाघमारे सर्व पोलीस ठाणे सोनखेड, बालाजी अंबलवाड,रमेश नागरगोजे डॉग स्कॉड)आणि पोलीस मित्र विष्णुकांत मोरे, परमेश्वर वड,सतीश बाशिंगे,भागवत मोरे,आनंद भारती सर्व राहणार मडकी यांच्या प्रयत्नांनी पळून गेलेला आरोपी पकडण्यात यश आले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या