🌟परभणीत उद्या मंगळवार दि.३० एप्रिल रोजी युगप्रवर्तक महोत्सवाचे आयोजन....!


🌟पंचधातूच्या ७० बुद्धमुर्तीचे होणार वितरण : सिनेगायक आनंद शिंदे यांची भिमगीत संगीत रजनी🌟

परभणी (दि.२९ एप्रिल) : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त उद्या मंगळवार दि.३० एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ०५-०० वाजता वसमत रस्त्यावरील विष्णु जीनिंग मैदानात सुप्रसिद्ध सिनेगायक आनंद शिंदे यांची बहरदार भीमगीत संगीत रजनी व युगप्रवर्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून  यावेळी पहिल्यांदाच भारतात थायलंड देशातील विविध आकाराच्या पंचधातूच्या ७० बुद्धमुर्तीचे वितरणही करण्यात येणार आहे.

           या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो (कार्याध्यक्ष, अ.भा.भिक्खू संघ), गगन मलिक फाउंडेशनचे अध्यक्ष तथा सिने अभिनेता डॉ.गगन मलिक,विशेष अतिथी म्हणून दक्षिण कोरिया देशातील योंगजो मुन, बून ही किम, किमन् हैयोन, सू जिर्योग मुन, सिने अभिनेत्री प्यूनिसावरापिसीत्कून संडी (थायलंड) इत्यादी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

              आश्रय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांच्या वतीने मागील २० वर्षांपासून भीमगीत संगीत रजनी, युगप्रवर्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी या महोत्सवात १४ एप्रिल रोजी जयंती मिरवणुकीत परभणी शहरात उत्कृष्ट व आदर्श देखावा सादर करणार्‍या विविध जयंती उत्सव समित्यांचा, प्रथम द्वितीय व तृतीय रोख बक्षीस, पारितोषिक देऊन सत्कार करण्यात येणार आहे. थायलंड देशातील विविध आकाराच्या ४ ते ७ फुटाच्या पंचधातूच्या ७० बुद्धमुर्तीचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठी राज्यभरातून नोंदणी झालेली आहे.

           दरम्यान, या भिमगीत संगीत रजनी व युगप्रवर्तक प्रवर्तक महोत्सव व बुद्धमुर्ती वितरण समारंभाला महिला, पुरुष, समाज बांधव, युवक-युवतींनी उपस्थित रहावे, असे आवाहन मुख्य आयोजक तथा निमंत्रक डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबीरे, भीमराव शिंगाडे, प्रा.डॉ. भीमराव खाडे, डॉ. बी. टी. धुतमल, भगवान जगताप, डॉ. प्रकाश डाके, प्रा. संजय जाधव, मिलिंद सावंत, अरविंद मक्ते, प्रा. राजेश रणखांबे, सुधीर कांबळे, पंकज खेडकर, प्रा.डॉ. सुनील तुरुकमाने, मंचक खंदारे, दिलीप मालसमिंदर, गौतम हत्तीअंबिरे, अ‍ॅड. हर्षवर्धन गायकवाड, उत्तम गायकवाड, चंद्रशेखर साळवे, प्रदीप जोंधळे, शशिकांत हत्तीअंबीरे, कपिल बनसोडे, अमोल धाडवे, भूषण कसबे, मकरंद बानेगावकर, अजय रसाळ, अजय वाघमारे आदिंनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या