🌟गद्दारांनो उद्धव साहेब संपले म्हणता तर टिका कशासाठी करता - खा संजय जाधव


🌟पाथरी तालुक्यातील वाघाळळ्यात आज पाडव्याच्या दिवशी झालेल्या सभेत बोलताना खा.जाधव यांनी केले विरोधकांवर टिका🌟

प्रतिनिधी

परभणी/पाथरी:-शिवसेना पक्ष प्रमुख प्रामाणिक पणे राज्य चालवत असतांना काहींनी गद्दारी केली शिवसेना पक्षाची पक्षाच्या चिन्हासह चोरी करत उद्धव ठाकरे संपल्याची भाषा करणारे गद्दार मात्र सकाळी उठल्या पासुन उद्धव साहेबांवर टिका करतात संपलेल्या माणसावर टिका करता मात्र आता जनता तुम्हाला कायम संपवल्या शिवाय गप्प बसणार नसल्याची खरमरीत टिका परभणीचे खा संजय जाधव यांनी आज मंगळवार दि.०९ एप्रिल रोजी पाडव्याच्या दिवशी वाघाळा येथे झालेल्या सभे दरम्यान बोलतांना केली.

या वेळी डॉक्टर सेलचे डॉ राम शिंदे,उपजिल्हा प्रमुख रविंद्र धर्मे,तालुका प्रमुख मुंजाभाऊ कोल्हे,जिल्हा परिषदचे माजी सदस्य माणिकअप्पा घुंबरे,युवासेनेचे अविराज टाकळकर,पांडुरंग शिंदे,पंचायत समितीचे माजी सदस्य पिंकू शिंदे,काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष विजयकुमार घुंबरे,युवक काँग्रेसचे डॉ महेश कोल्हे यांची या वेळी उपस्थीती होती.

पुढे बोलतांना खा.जाधव म्हणाले की भाजप सरकार च्या घोषणा म्हणजे नुसती जुमलेबाजी असून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतो म्हणणारे प्रत्यक्षात शेती मालाचे भाव पाडून राहिल्याने आज शेतकरी मोठ्या संकटात सापलेला आहे. खताच्या किमती भरमसाठ वाढवल्या त्यात त्या परत दहा किलो खत कमी हे भाजप सरकार म्हणजे नुसते लुटारू असल्याची खा जाधव यांनी या वेळी करत आबकी बार चार सौ पार म्हणनारे इतर पक्षांची फोडा फोडी का करताहेत?असा सवाल करत भाजपाला या वेळी विजयाची खात्री नसल्यानेच ते फोड तोड करत इडी,सिबीआयचा वापर करत असल्याचा आरोप करत जातियवादाचे राजकारण बीजेपी करत असल्याचे म्हणाले.भाजपाच्या जातीच्या राजकारणाला जनता भिकघालनार नसल्याचा विश्वास ही खा जाधव यांनी या वेळी व्यक्त केला. या सोबतच आम्हीच हिंदू धर्माचे रक्षक असल्याचे दाखवत अर्धवट राम मंदिराचे उदघाटन आटोपले पण या साठी कोणी संघर्ष केला हे जनतेला चांगले माहिती असल्याचे ही ते या वेळी म्हणाले.गद्दारांना मतदार योग्य जागा दाखऊन देत जनता पुन्हा उद्धव ठाकरेंना साथ देईल असा विश्वास व्यक्त करत.आपण एक नव्हे तर दोन मेडिकल कॉलेज परभणी साठी आणले पुढील पाच वर्षात आपण परभणीचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न निश्चित करू असे आश्वासन देत या वेळी पहिल्यांदाच कोणत्याही पक्षाचे अधिकृत चिन्ह नसल्या ने ही निवडणुक मतदारां साठी ही आव्हाण असून शिवसेनेची मशाल परभणी मतदार संघात नक्कीच धगधगेल असा विश्वास खा जाधवांनी व्यक्त केला.

या वेळी प्रास्ताविक उपजिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे यांनी केले तर सुत्र संचालन सचिन वाघ यांनी केले. या वेळी मुस्लिमबांधवांना खा जाधव यांचा सत्कार केला. या कार्यक्रमासाठी वाघाळा येथील सर्व समाजाचे नागरीक मोठ्या संखेने उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या