🌟पुर्णा तालुक्यातील फुकटगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जमला पाण्याचा अक्षरशः ढव : रेल्वे प्रशासन जवाबदार...!


🌟शाळेतील विद्यार्थी विद्यार्थीनींची उडाली तारांबळ : परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी🌟


पुर्णा (दि.०९ एप्रिल) - पुर्णा तालुक्यात सर्वत्र काल मंगळवार दि.०९ एप्रिल पासून सुरू असल्याने तालुक्यातील मौ.फुकटगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सर्वत्र अवकाळी पावसाच्या पाण्याचा ढव साचत असल्याने शाळेची दुरावस्था झाली असून यास सर्वस्वीपणे रेल्वे प्रशासनासह गुत्तेदाराच्या गलथान कारभार जवाबदार आहे.


रेल्वे प्रशासना व संबंधित गुत्तेदाराकडून आउटलेटची पाईपलाईन करताना फुकटगाव येथील सर्व ग्रामस्थांनी व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी संबंधितांना भविष्यात निर्माण होणाऱ्या शाळेसमोरील पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याच्या तळ्यांबद्दल अगोदरच कल्पना दिली होती परंतु गावकऱ्यांच्या सांगण्याकडे संबंधितांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केले होते शाळेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना भविष्यात होणाऱ्या त्रासाबद्दल गावातील अडाणी गावकऱ्यांना कळाले परंतु सुशिक्षित इंजिनिअर,गुतेदार यांना मात्र कळले नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल संबंधितांनी केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याच प्रकार केल्याचे यावरुन निदर्शनास येत आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या