🌟परळी वैद्यनाथ येथील संदिप चौंडे यांना मातृशोक....!


🌟श्रीमती रमाबाई रविंद्रअप्पा चौंडे यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी दुःखद निधन🌟 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- संदिप चौंडे व सुरज चौंडे यांच्या मातोश्री श्रीमती रमाबाई रविंद्रअप्पा चौंडे यांचे अल्पशा आजाराने मंगळवार दि.१६ एप्रिल रोजी दुःखद निधन झाले आहे. मृत्यू समयी त्यांचे वय ५७ वर्ष होते.

 शहरातील अंबेवेस भागातील श्रीमती रमाबाई रविंद्रअप्पा चौंडे यांचे मंगळवार दि. १६ एप्रिल २०२४ रोजी ११.३० वा.अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. संदिप चौंडे व सुरज चौंडे यांच्या मातोश्री होत. वीरशैव समाजाच्या विविध सामाजिक, धार्मिक कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग असायचा. अत्यंत मनमिळावू स्वभावामुळे त्या सुपरिचित होत्या. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार दि.१६ एप्रिल रोजी ५ वाजता वीरशैव स्मशानभुमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात २ मुले १ मुलगी , सुना, नातवंडे असा  परिवार आहे. चौंडे परिवाराच्या दुःखात दैनिक ......... परिवार सहभागी आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या