🌟पुर्णेतील श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक बालसंस्कार केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराज प्रगटदिन सोहळा संपन्न....!


🌟श्री स्वामी चरित्र सामूहिक पारायण व विविध प्रकारच्या आध्यात्मिक सेवेचे आज आयोजन करण्यात आले होते🌟


पुर्णा (दि.१० एप्रिल) - पुर्णा शहरातील अमृतनगर परिसरातील श्री.स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक बालसंस्कार केंद्रात आज बुधवार दि.१० एप्रिल २०२४ रोजी श्री स्वामी समर्थ महाराज प्रगटदिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री स्वामी चरित्र सामूहिक पारायण व विविध प्रकारच्या आध्यात्मिक सेवेचे आयोजन करण्यात आले होते.

शहरातील अमृतनगर परिसरातील श्री.स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक बालसंस्कार केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराज प्रगटदिन सोहळा आज बुधवार दि.१० एप्रिल रोजी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास महाआरती सहित मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पूर्णा शहर व पंचक्रोशीतील भाविक सेवेकरी श्री स्वामी जयंती उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .यावेळी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रा चे प्रतिनिधि श्री नितिन कापसे यांनी  सेवा मार्गाबद्द्ल माहिती सांगताना सेवा मार्गा चे संपूर्ण आध्यात्मिक कार्य व सामजिक कार्य यांबद्द्ल उपस्थित भाविकांना विशेष माहिती सांगितली तसेच श्री स्वामी जयंती उत्सव हा मांदीयाळी स्वरूपात साजरा करण्यात येत असतो, स्वामी जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी सर्व सेवेकरी व भाविक यांनी नियोजन केले होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या