🌟पुर्णेतील टि पॉईंट परिसरातील संत तुकाराम महाराज दुध डेअरी येथे दुध उत्पादक शेतकरी मेळाव्याचे आयोजन....!


🌟दुध उत्पादक शेतकरी मेळाव्यास शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - सुरेश शिंदे 


पुर्णा (दि.२६ एप्रिल) - पुर्णा शहरातील टि पॉईंट परिसरातील संत तुकाराम महाराज दुध डेअरी येथे उद्या शनिवार दि.२७ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ०९-०० वाजेच्या सुमारास दुध उत्पादक शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या दुध उत्पादक शेतकरी मेळाव्यास दुग्ध व्यवसायातील मान्यवर तज्ञ दुध उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शक करणार आहेत.


संत तुकाराम महाराज दुध डेअरीच्या वतीने आयोजित या दुध उत्पादक शेतकरी मेळावा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार तथा दैनिक सकाळचे प्रतिनिधी मा.जगदीश जोगदंड सर तर विशेष उपस्थितांमध्ये हभप.नारायन महाराज टाकळकर तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी मा.रवी हरणे परभणी,सेवानिवृत्त पशुधन विकास अधिकारी डॉ.माधव साखरे, सेवानिवृत्त बँक अधिकारी मा.सुनिल हट्टेकर परभणी,सेवानिवृत्त पशुधन विकास अधिकारी मा.डॉ.अशोक दारनुळे, भारतीय स्टेट बँक शाखा पुर्णाचे शाखा व्यवस्थापक मा.गोपाळ काटोळे,जंग-ए-अजित न्युज हेडलाईन्स संचालक/संपादक चौधरी दिनेश आदींसह प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.श्रीणू सर (DM P&I Co),डॉ.प्रेमांशु सौरव (RHPI NDD),डॉ.अमर जाधव (Assistant Manager),डॉ.फय्याज शेख (Unit Incharge Tadkalas) आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार असून या भव्य दुध उत्पादक शेतकरी मेळाव्यास दुग्ध उत्पादक शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संत तुकाराम महाराज दुध डेअरीचे संचालक सुरेश नामदेवराव शिंदे यांनी केले असून अधिक माहितीसाठी त्यांच्या मोबाईल क्रमांक 9405112529 या क्रमांकावर संपर्क साधावा असेही आवाहन त्यांनी दुध उत्पादक शेतकऱ्यांना केले आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या