🌟परभणी लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य मतदार प्रस्थापित लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणास अक्षरशः कंटाळले....!


 🌟परभणीत जिल्ह्यात आता परिवर्तनाची लाट : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पंजाबराव डख यांचे प्रतिपादन🌟 

परभणी (दि.०४ एप्रिल) :  परभणी लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य मतदार जनता जिल्ह्यातील प्रस्थापित लोकप्रतिनिधी पुढाऱ्यांच्या नाकर्तेपणास अक्षरशः कंटाळली असून त्यामुळेच या मतदारसंघात परिवर्तनाची लाट उसळली आहे असे मत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार तथा हवामान अभ्यासक शेतकरी मित्र पंजाबराव डख यांनी व्यक्त केले आहे.

                वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पंजाबराव डख यांनी आज गुरुवार दि.०४ एप्रिल रोजी दुपारी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात परभणी लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या पाठोपाठ डख यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना आपण निवडणूक लढवू इच्छित होतो. विशेषतः वंचित बहुजन आघाडीकडूनच उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशिल होतो. ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती व सर्वसामान्यांच्या व्यथा, इच्छा, आकांक्षांना वाचा फोडण्याकरीता आपण लोकसभेवर जावू इच्छितो आहोत, असे नमूद केले होते. आंबेडकर यांनी आपल्यावर विश्‍वास दाखवून  उमेदवारी बहाल केली. आपण त्यांचे आभारी आहोत. सर्वसामान्य शेतकर्‍याच्या कुटूंबातला आपला जन्म असून शेतकर्‍यांच्या व बहुजनांच्या हिताकरीता आपण सदैव कटीबध्द आहोत. निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर अनंत प्रश्‍न आहेत. विशेषतः सर्वसामान्यांच्या हातास काम नाही. औद्योगिक वसाहती ओसाड आहेत. शेतकर्‍यांच्या मालास भाव नाही. हमीभावसुध्दा दिला जात नाही. यासह अनेक प्रश्‍न आ वासून उभे आहेत. या स्थितीत ते प्रश्‍न सुटावेत म्हणून आपण लोकसभेत आवाज उठवू, असा विश्‍वासही डख यांनी व्यक्त केला. परभणीत परिवर्तनाची लाट असून त्यावरच या मतदारसंघात या निवडणूकीत परिवर्तन हे अपेक्षितच आहे, असे मत डख यांनी व्यक्त केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या