🌟यासाठी महाराष्ट्र शासनाने परिपत्रकाद्वारे शुक्रवार दि.26 एप्रिल, 2024 रोजी सार्वजनीक सुट्टी जाहिर केल्याचे कळविले🌟
परभणी (दि.22 एप्रिल) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने 17-परभणी लोकसभा मतदार संघाकरीता दूसऱ्या टप्प्यात शुक्रवार दि. 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. त्या दिवशी मतदारांना मतदान करता यावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने परिपत्रकाद्वारे शुक्रवार दि.26 एप्रिल, 2024 रोजी सार्वजनीक सुट्टी जाहिर केल्याचे कळविले आहे.
लोकसभा निवडणुकीत कामगारांना मतदान करता यावे, यासाठी परभणी लोकसभा मतदार संघ निवडणूक क्षेत्रातील मतदार असलेले कामगार / अधिकारी/ कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. तसेच सदर सुट्टी सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहील. (उदा. राज्य शासन, केंद्र शासन व खाजगी कंपन्या या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ.) अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी-कर्मचारी इत्यादीना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल, तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी संबंधित महानगरपालिका आयुक्त अथवा जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत कामगारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.
सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी / व्यवस्थापनाने वरील आदेशाचे अनुपालन होईल याची खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल, सदर तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरीय दक्षता समिती स्थापना करण्यात आली आहे. तक्रार निवारणसाठी नोडल अधिकारी म्हणुन सरकारी कामगार अधिकारी विद्याधर माणगावंकर (मो.नं. 9834861591), महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र अमोल बडे (मो.नं.9518559040) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी वि.नं. माणगांवकर यांनी केले आहे......
****
0 टिप्पण्या