🌟पुर्णा तालुक्यातील जेसीबी वसमत तालुक्यातील इंजनगावातून चोरी : वसमत ग्रामीण पोलीसांनी लावला दिड महिन्यात शोध.....!


🌟स्थानिक गुन्हें शाखेच्या कर्तव्यतत्पर अधिकाऱ्यांनी प्रकरणाचा यशस्वीपणे तपास लावल्यात मिळवले यश🌟


पुर्णा (दि.१६ एप्रिल) :- पुर्णा तालुक्यातील आडगाव लासीना येथील अंबादास भोरे यांच्या मालकीचा जेसीबी ज्याचा क्रमांक एम एच २२ एएम १४४८ हा त्यांनी भाडेतत्त्वावर गुत्तेदार गंगाधर तांबे यांना दिला होता सदरील जेसीबी संबंधित गुत्तेदाराने मागील मार्च महिन्यात वसमत तालुक्यातील कामावर नेला होता काम संपल्यावर दि.०३ मार्च २०२४ रोजी जेसीबी ऑपरेटरला वसमत तालुक्यातील इंजनगाव पुर्व शिवारातील आखाड्यावर लावण्यास सांगितला  परंतु त्याच दिवशी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना घडली होती या संदर्भात दि.०४ मार्च २०२४ रोजी वसमत ग्रामीण पोलीस स्थानकात गुरनं.११२/२०२४ कलम ३७९ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेतील जेसीबीचा तात्काळ शोध लावून गुन्ह्यातील सहभागी आरोपी पकडणे बाबत हिंगोली जिल्हा पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सुचना दिल्या होत्या त्यावरून स्थागुशाचे पो.नि.विकास पाटील यांचे मार्गदर्शनात स्थागुशाचे सपोनि.राजेश मलपीलू आणि त्यांचे पथक यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे गतिमान करुन गोपनीय बातमीदाराच्या मदतीने तपास करीत  सदरील गुन्हा संजय अंबादास इंगोले वय ३२ वर्ष राहणार देगाव तालुका पुर्णा याने इतर साथीदारांमार्फत मिळून केल्याबाबत पथकाला माहिती मिळाल्याने स्थागुशाचे सपोनि.राजेश मलपीलू आणि त्यांचे पथकाने दि.१५ एप्रिल २०२४ रोजी आरोपी संजय अंबादास इंगोले यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने आपल्या इतर साथीदारांसोबत गुन्हा केल्याची त्याने कबूली दिली त्याच्या जवाबावरुन पथकाने इतर दोन आरोपी नामें अल्लाबक्श मेहबूब पठाण वय ३२ वर्ष राहणार पाथरी जिल्हा परभणी व युवराज उत्तम कठाळे वय ४० वर्ष राहणार दहवंडी तालुका शिरूर जिल्हा बिड यांना ताब्यात घेऊन नमूद आरोपींच्या ताब्यातून फिर्यादी अंबादास भोरे यांचा चोरीला गेलेला डिएस्क कंपनीची जेसीबी मशीन किंमत २० लाख रुपयें जप्त करुन घटनेतील तिन्ही आरोपींना जेसीबीसह पुढील तपासकामी वसमत ग्रामीण पोलीस स्थानकाचे स्वाधीन करण्यात आले आहे सदरील गुन्ह्याचा तपास लावण्यात वसमत ग्रामीण पोलीस स्थानकाला दिड महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर देखील यश आले नसल्यामुळे सदरील तपास स्थानिक गुन्हें शाखेकडे देण्यात आल्यानंतर स्थानिक गुन्हें शाखेच्या कर्तव्यदक्ष कर्तव्यतत्पर अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा यशस्वीपणे तपास लावल्याने संबंधित अधिकाऱ्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या