🌟सेलू येथील वसंत प्रतिष्ठानच्या वतीने पसायदान प्रवचन मालेचे आयोजन....!

 


🌟श्रीक्षेत्र पंढरपूर येथील प्रसिद्ध श्रीगुरु हभप.चैतन्य महाराज देगलूरकर गुंफणार पुष्प🌟

सेलू (दि.20 एप्रिल) - सेलू येथील वसंत प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी आयोजित केले जाणारे पसायदान या प्रवचन मालेचे आयोजन दि 23 ते 25 (मंगळवार ते गुरुवार) एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले आहे.येथील साई मंदिरात दररोज सायं 6.30 ते 8.30 या वेळेत हे प्रवचन होणार आहे.

श्रीक्षेत्र पंढरपूर येथील प्रसिद्ध श्रीगुरु ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या प्रासादिक वाणीमधून ही प्रवचनमाला संपन्न होणार आहे.यावर्षी या प्रवचन मालेचे हे 5 वे पुष्प आहे.दरवर्षी शहरातील असंख्य भक्त या प्रवचनाचा लाभ घेतात.याहीवर्षी सर्व भाविकांनी या प्रवचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन वसंत प्रतिष्ठानचे महेशराव खारकर,ऍड.उमेशराव खारकर,माजी प्राचार्य डॉ शरद कुलकर्णी,प्रकाश कुरुंदकर, प्रा.संजय पिंपळगावकर,गंगाधर कान्हेकर,अजित मंडलिक,विनोद मोगल,नंदू धर्माधिकारी,ऍड.किशोर जवळेकर,डॉ प्रवीण जोग,आणि वसंत प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या