🌟समाज कल्याण सहाय्यक आयुक्त गीता गुट्टे महिला उन्नती संस्थेच्या पुरस्काराने सन्मानित....!


🌟महिला उन्नती संस्थेच्या सौ.आशा कोल्हे यांनी सहाय्यक आयुक्त गीता गुट्टे मॅडम यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला🌟


परभणी - येथील सामाजिक न्याय विभागाच्या सहा. आयुक्त गीता गुट्टे ,समाजातील विविध घटकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देत  समाज कल्याणाचे करीत असलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन ,महिला उन्नती संस्था( भारत) नवि दिल्ली मार्फत चालविलेल्या अभियानाअंतर्गत , जागतिक महिला दिनी जाहीर झालेला पुरस्कार 5 एप्रिल 2024 रोजी महिला उन्नती संस्थे चे मराठवाडा विभागीय अध्यक्ष, जेष्ठ पत्रकार मदन(बापू )कोल्हे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .महिला उन्नती संस्थेच्या सौ.आशा कोल्हे यांनी सहाय्यक आयुक्त गीता गुट्टे मॅडम यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा आदर्श शिक्षक दि.फ.लोंढे,महिला उन्नती संस्थेचे मराठवाडा विभागीय मीडिया चीफ देवानंद वाकळे ,सामाजिक कार्यकर्ते ,राजकुमार एंगडे यांची उपस्थिती लाभली होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या