🌟भारतीय संविधान नाही तर इंडिया आघाडी धोक्यात रिपाइं नेते रामदास आठवले यांचा सनसनीखेज टोला......!


🌟निळा झेंडा महादेव जानकरांच्या पाठीशीच : परभणीकरांनी प्रचंड मताधिक्यांनी जानकरांना निवडून द्यावे - रामदास आठवले


परभणी (दि.२० एप्रिल) : परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे बलाढ्य उमेदवार महादेव जानकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज शनिवार दि.२० एप्रिल रोजी परभणीत दुपारी ऐतिहासिक जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती त्या सभेत रिपाइं (आठवले) गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे सभेला संबोधित करतांना म्हणाले की भारतीय संविधान नव्हे तर इंडिया आघाडीच पूर्णतः धोक्यात आली आहे अशी प्रखर टिका यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली.      

             राज्य व केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने दलित, पददलित, वंचित, उपेक्षित, कष्टकरी, अल्पसंख्यांक वगैरे घटकांच्या हितासाठी कटिबध्द, सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. प्रत्येक घटक विकासाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावा, हा शुध्द हेतू डोळ्यासमोर ठेवला आहे. त्यामुळेच केंद्र व राज्य पुरस्कृत योजना मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरत आहेत. त्यामुळेच विरोधकांच्या पोटात मोठा गोळा उठला आहे. अब की बार चारसों पार असा नारा देवून महायुती रिंगणात उतरली. परंतु, महाविकास आघाडीच्या पोटात मोठा गोळा उठला. त्यामुळेच अब की बार चारसों पार या घोषणेस प्रत्तुत्तर म्हणून महायुती संविधान बदलवू इच्छित आहे, अशी आरोळी विरोधकांनी ठोकली आहे. परंतु, भारतीय संविधान नव्हे तर विरोधकांची इंडिया आघाडीच पूर्णतः धोक्यात आली असल्याची टिका आठवले यांनी केली. जानकर हे हट्टी आहेत म्हणूनच परभणीतून विरोधकांची शिट्टी वाजणार आहे, असे नमूद करीत आठवले यांनी जानकर यांना परभणीकरांनी प्रचंड मताधिक्यांनी निवडून द्यावे, असे आवाहन केले......टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या