🌟हा सोहळा वेदशास्त्रसंपन्न विलासशास्त्री पाठक यांच्या पौराहीत्याखाली संपन्न🌟
फुलचंद भगत
वाशिम - सर्व शाखीय महाराष्ट्रीयन ब्राह्मण मंडळी वाशीमच्या वतीने रविवार २८ एप्रिल रोजी स्थनिक श्री मध्यमेश्वर संस्थानमध्ये सामुहिक व्रतबंध (मौंज) सोहळा उत्साहात, धार्मिक व आनंदी वातावरणात पार पडला. या सामुहिक व्रतबंध सोहळ्यात चि. अनय मंदार कविमंडन, चि. आराध्य संजय कारंजकर, चि. अभिराम संजय कारंजकर, चि. ऋषिकेश विजय कुळकर्णी आणि चि. प्रशांत शामराव काटेकर या बटुंवर व्रतबंध संस्कार करण्यात आले. हा सोहळा वेदशास्त्रसंपन्न विलासशास्त्री पाठक यांच्या पौराहीत्याखाली व रमेशराव लक्रस यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत मंगलमय वातावरणात पार पडला.
सामुहिक व्रतबंध सोहळा यशस्वी करण्यासाठी विकासराव देशपांडे , राजेश संगवई, गजानन काळपांडे, गजानन बावणे, देविदत्त देव, पंकज लक्रस, डॉ.सुहास पांडे, प्रसाद निरखी, शशिकांत दंडवते, शाम संगवई, प्रियांश लक्रस, ओंकार काळपांडे, ऋषिकेश शेवलकर आदींनी सहकार्य केले.....
0 टिप्पण्या