🌟परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकरांना दोन अपक्ष उमेदवारांचा बिनशर्त पाठिंबा....!


🌟अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे यांच्या नंतर अपक्ष उमेदवार अनिल मुदगलकर यांचे देखील महायुतीला बिनशर्त समर्थन जाहीर🌟


परभणी (दि.२४ एप्रिल) : परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना दोन अपक्ष उमेदवारांनी बिनशर्त पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून परभणी लोकसभा मतदारसंघात एकून २१ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून त्यातील अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी काल मंगळवार दि.२३ एप्रिल रोजी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना बिनशर्त जाहीर पाठिंबा देण्याच्या घोषणेला चोवीस तासही उलटत नाही तोच प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अनिल मुदगलकर यांनी आज बुधवार दि.२४ एप्रिल रोजी महायुतीचे उमेदवार महादेवराव जानकर यांना आपला बिनशर्त पाठींबा जाहीर केला आहे.

            केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी मुदगलकर कुटूंबियांशी संपर्क साधला व महायुतीच्या उमेदवारास पाठींबा जाहीर करावा अशी विनंती केली त्या पाठोपाठ ज्येष्ठ नेते विजय वरपुडकर, उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर यांनी मुदगलकर यांची भेट घेतली व त्याअनुषंगाने चर्चा केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबरोबर बोलणे करुन दिले.  त्यानंतर मुदगलकर यांनी महायुतीस आपला पाठींबा जाहीर केला. मुदगलकर हे भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष, माजी नगरसेवक आहेत.

             दरम्यान, ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, आमदार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर, माजी नगरसेवक सुनील देशमुख यांनी मुदगलकर यांचे अभिनंदन केले व भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या