🌟संध्याकाळी गावातील मुख्य रस्त्यावरून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली🌟
✍🏻शिवशंकर निरगुडे - हिंगोली
हिंगोली : थोर समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती हिवरखेडा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सकाळी मारोती मंदिर सामोरे महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ११ एप्रिल रोजी म. फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले चौक येथील प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले व तसेंच दुपारी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते संध्याकाळी गावातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी गावातील महिलांनी घरोघरी रांगोळी काढून मिरवणूकीचे स्वागत करण्यात आले या वेळी उपस्थिती सरपंच सौ पूजा अमोल मस्के .मीनाक्षी शरद निरगुडे ग्रामपंचायत सदस्य. रामदास निरगुडे. शिवाजीराव गायकवाड. आकाश निरगुडे .पत्रकार शिवशंकर निरगुडे .रवि शिरसागर .अमोल ईरतकर .राम देसाई .दत्ता .देसाई अमोल ईरतकर जितेंद्र ईरतकर अनिल निरगुडे अभिषेक निरगुडे सुनील निरगुडे .विठ्ठल काळे ज्ञानेश्वर गायकवाड गजू शिरसागर व तसेंच गावातील सर्व तरुण मंडळीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.....
0 टिप्पण्या