🌟क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराचे वारसदार व्हा...!


🌟सुप्रसिद्ध विधीतज्ञ एडवोकेट ज्योतिबा पिसाळ यांचे प्रतिपादन🌟

पुर्णा (दि.11 एप्रिल) - भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महामानव तथागत भगवान बुद्ध सार्वजनिक जयंती मंडळ पूर्णाच्या वतीने महात्मा फुले नगर पूर्णा या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले जयंती महोत्सवाचे आयोजन जयंती मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक अखिल भारतीय भिख्खू संघाचे कार्याध्यक्ष  पूज्य भदंत डॉ.उपगुप्त महाथे रो सार्वजनिक जयंती मंडळाचे अध्यक्ष पूज्य भदंत बोधिधम्मा पूज्य भदंत पयावंश त्यांच्या मार्गदर्शनाखाली व पूर्णा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष नगरपालिकेचे गटनेते उत्तम भैया खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. 

स्वागताध्यक्ष सुप्रसिद्ध विचारवंत प्राचार्य राम धबाले यांची उपस्थिती होती प्रमुख वक्ते व सत्कार मूर्ती मुंबई उच्च न्यायालयाचे सुप्रसिद्ध विधी तज्ञ भारतीय राज्यघटनेचे अभ्यास एडवोकेट ज्योतिबा पिसाळ हे होते विचार मंचावर नगरसेवक एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड नगरसेवक एडवोकेट धम्मदीप जोंधळे सामाजिक कार्यकर्ते दादाराव पंडित संस्कृती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर केशव जोंधळे भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष शामराव जोगदंड रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष बाबाराव वाघमारे आदींची उपस्थिती होती. 

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर प्रथोचित प्रकाश टाकताना एडवोकेट ज्योतिबा पिसाळ यांनी क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांचे सामाजिक शैक्षणिक कृषी विषयक विचार विशद केले शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं कार्य शिक्षण क्षेत्रामध्ये त्या काळामध्ये त्यांनी सुचविलेल्या सुधारणा शेतकरी कष्टकरी शूद्र अति शूद्र आणि स्त्री वर्गासाठी त्यांनी केलेलं अभूतपूर्व कार्य या बाबीला जगाच्या इतिहासात तोड नाही. 

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरुस्थानी मानलं होतं आपल्या गुरूला जे जे काही अभिप्रेत होतं ते त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार या नात्याने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले त्यांचे विचार भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

गुरु शिष्याचं नातं कसा असाव हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून शिकण्यासारखा आहे जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन विशुद्ध मानवतेवर आधारित गुरु शिष्याची ती एक आदर्श परंपरा आहे. असे ते म्हणाले अलीकडच्या काळामधील राज्यकर्त्याची शिक्षण विषयक धोरणे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शिक्षण विषयक विचाराला हरताळ फासणारी आहे.

शिक्षणाचे खाजगीकरण कंत्राटीकरण विनाअनुदानित धोरण आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना सरसकट पास करणे सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना ट्युशन बंदी आदीमुळे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून निश्चितचपणे बहुजन समाज दूर जाणार आहे कार्यक्रमाचे स्वागता ध्यक्ष प्राचार्य राम धबाले सर यांनी जयंती मंडळाने आयोजित केलेल्या उपक्रमाचे कौतुक केले महापुरुष व समाज सुधारक यांचे विचार आचरणात आणण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे असे याप्रसंगी ते म्हणाले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तम भैया खंदारे यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनामधील विविध प्रसंग सांगून उपस्थितांना अंतर्मुख केले त्या काळामध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराला समर्थ साथ देण्याचं काम त्यांनी केलं मनुवादी व्यवस्थेने त्यांना शिक्षणा च्या कार्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी तो हाणून पाडला. 

पूज्य भदंत बोधिधम्मा यांनी जयंती मंडळाकडून विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबविले जात आहेत त्याचाच एक भाग क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती महोत्सवाचा आयोजन आहे तथागत मित्रमंडळाने तयार केलेल्या विद्यार्थिनीचे लेझीम पथक यांनी अतिशय नयन मनोहर उत्कृष्ट सादरीकरण केले व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती मंडळाचे पदाधिकारी साहेबराव सोनवणे अतुल गवळी किशोर ढाक र गे इंजिनीयर विजय खंडागळे इंजिनीयर बंटी भैया रणवीर बोधाचार्य त्र्यंबक कांबळे आदींनी परिश्रम घेतले प्रास्ताविक किशोर ढाकरगे यांनी तर सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या