🌟प्रशिक्षण संस्थांनी कौशल्य विकास प्रशिक्षणाची ३ मेपर्यंत मागणी नोंदविण्याचे आवाहन.....!


🌟असे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले आहे🌟

परभणी (दि.३० एप्रिल) : परभणी जिल्ह्यातील कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थांनी कौशल्य विकास प्रशिक्षणाची मागणी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उ‌द्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी यांच्याकडे दि.०३ मे पर्यंत करण्याचे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले आहे. 

 राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई यांना सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता जिल्हा कौशल्य विकास आराखडा तयार करून तांत्रिक मान्यतेसाठी पाठवायचा आहे. या आराखड्यामध्ये जिल्ह्यातील कौशल्य विकास प्रशिक्षणामध्ये कामकाज करणाऱ्या प्रशिक्षण संस्थांनी मागणी केलेल्या अभ्यासक्रमांचा समावेश करावयाचा आहे.

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उ‌द्योजकता मार्गर्शन केंद्रांकडून  जिल्ह्याच्या स्किल गॅप स्टडीनुसार व कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थांच्या मागणीनुसार जिल्हा कौशल्य विकास आराखडा तयार करते........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या