🌟लोक सहभागातून जिल्हा क्रीडा संकुल येथे स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन....!


🌟या स्वच्छता अभियानामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे - जिल्हा क्रिडा अधिकारी कविता नावंदे 

परभणी (दि.04 एप्रिल) : दिनांक 6 एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय जागतिक क्रीडा विकास व शांती दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. या निमित्त जिल्ह्यातील सर्व खेळ संघटना, क्रीडा प्रेमी नागरिक,खेळाडू, प्रशिक्षक, जागृत नागरिक यांच्या मार्फत लोक सहभागातून क्रीडा संकुलात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.

या स्वच्छता अभियांनाचे उद्घाटक परभणी शहर महानगर पालिका आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते होणार आहे.  या अभियानाचा समारोप जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते होणर आहे. आपले क्रीडा संकुल स्वच्छ ठेवण्यासाठी व या माध्यमातून जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करण्यासाठी तसेच प्रत्येक नागरिक यांना क्रीडा संकुल आणि हा परिसर आपला वाटावा याही उद्देशाने या स्वच्छता अभियानामध्ये दिनांक 6 एप्रिल 2024 रोजी सकाळी 6.30 वाजता विविध क्रीडा संघटना, सामाजिक संघटना, डॉ. आंबेकर आणि त्यांचा संघ, डॉ. कालाणी आणि त्यांचा संघ, लॉयन्स क्लब परभणी अशा विविध संघटना सहभागी होणार आहेत. तसचे या स्वच्छता अभियानामध्ये नागरिकांने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी केले आहे.....  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या