🌟परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक : निवडणूक निरीक्षक (खर्च) अनुराग चंद्रा यांची नियुक्ती....!


🌟अनुराग चंद्रा यांच्याशी संपर्क साधण्यासाठी मोबाईल क्रमांक 7420840781 या क्रमांकावर संपर्क साधता येणार🌟

परभणी (दि.12 एप्रिल) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने 17 परभणी लोकसभा मतदार संघाकरीता अनुराग चंद्रा (आय.आर.एस.) यांची निवडणुक निरीक्षक (खर्च) म्हणुन नियुक्ती केली आहे.

निवडणूक निरिक्षक (खर्च) अनुराग चंद्रा यांच्याशी संपर्क साधण्यासाठी मोबाईल क्रमांक 7420840781 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. निवडणूक कालावधीत अनुराग चंद्रा यांचा मुक्काम सावली शासकीय विश्रामगृह, परभणी येथे असणार आहे. निवडणुक निरीक्षक (खर्च) यांचे संपर्क अधिकारी म्हणुन जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवटे,  भ्रमणध्वनी क्रमांक 9422636767 यांची नियुक्ती करण्यात आल्याचे असे जिल्हा निवडणूक यंत्रणेने कळविले आहे......  

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या