🌟व्हाट्सअप पोस्टचा पाठपुरावा केल्याने मैराळ सावंगी वाशीयांना मिळाले पिण्याचे पाणी.....!


🌟पोल बसवण्यासाठी पुढाकार घेतलेले शिवाजी जाधव आणि सखाराम बोबडे पडेगावकर यांचे ग्रामस्थांनी मानले आभार🌟

गंगाखेड (दि.२७ एप्रिल) वादळी वाऱ्यात विजेचा पोल कोलमडून पडल्याने प्यायला पाणी मिळेना अशी पोस्ट व्हाट्सअप वर आली. या पोस्टचा परभणी लोकसभेचे अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी पाठपुरावा केल्याने दोनच दिवसात मैराळ सावंगी वाशीयांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला

मैराळ सावंगी येथील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी जाधव यांनी गावातील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या मोटारीला विद्युत पुरवठा करणारा  विद्युत पोल वादळी वाऱ्याने तुटून पडल्याची पोस्ट व्हाट्सअप वर टाकली होती. प्रचाराच्या घाईगडबडीत ही पोस्ट अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी वाचताच महावितरण अधिकाऱ्यांशी तात्काळ पाठपुरावा केला. प्रभारी उपविभागी अभियंता भसारकर यांनी दोन दिवसात वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते. मतदानाच्या पूर्वस्येलाच हा पोल बसवण्यात आला. रविवारी ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळाले. नवीन पोल बसवण्यासाठी पुढाकार घेतलेले शिवाजी जाधव आणि सखाराम बोबडे पडेगावकर यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या