🌟पुर्णा तालुक्यातील मागणी येथील ओंकार गृह उद्योगास सौ.रूपालीताई रघुनाथ गावडे यांची सदिच्छा भेट....!

(रुपालीताई गावडे, क्रांती काळे यांची ओंकार  गृह उद्योगास भेट देत आंबा लोणच्याची प्रात्यक्षिक पाहीले करू

🌟यावेळी त्यांच्या सोबत अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या पत्नी क्रांती काळे,आत्माच्या अधिकारी स्वाती घोडकेंची उपस्थिती🌟


पुर्णा (दि.१५ एप्रिल) :- पुर्णा तालुक्यातील माखणी येथील पुरस्कार प्राप्त प्रगतसिल शेतकरी जनार्धन आवरगंड मिरा आवरगंड यांच्या ओंकार गृह उद्योगास जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या पत्नी रूपाली गावडे व परभणी जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या पत्नी क्रांती काळे,आत्माच्या अधिकारी स्वाती घोडके यांनी दिली सदिच्छा भेट दिली.

             दरवर्षी या ओंकार गृह उद्योग येथून १० ते  १५ क्विंटल ग्राहकांच्या मागणीनुसार  आंब्याचे उत्कृष्ट लोणचे तयार केले जाते. विशेष म्हणजे या संपूर्ण लोणच्याची विक्री व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून ऑर्डर घेऊन केली जाते. माखणी या छोट्याशा गावातील या ओंकार उद्योगातील लोणच्याबरोबरच आंबा कोइपासुन सुपारी, वाळकाच्या उसऱ्या, दाळी, लाकडी  घाण्याचे तेल  , पापड , शेवया अनेक उत्पादने पाहुन वरील मान्यवरांनी उद्योगाची तोंड भरून कौतुक केले.

    ओंकार उद्योगातील सर्व उत्पादने पाहून त्यांनाही कौतुक वाटले. एका छोट्याशा गावात राहुन कोणतीही दळण-वळणाची साधने नसताना असा उद्योग उभारणे सोपे नसते. परंतु जनार्दन आवरगंड आणि त्यांच्या पत्नी मिरा आवरगंड यांनी कुटुंबीयांच्या मदतीने अत्यंत  प्रमाणिक कष्टाने हा उद्योग उभारला. दरवर्षी स्वत:च्याच एकरभर शेतातील आंब्याचे लोणचे ते तयार करतात. गतवर्षी १५ क्विंटल आंब्याचे त्यांनी लोणचे बनवले होते आणि व्हॉटस्अ‍ॅपवर ऑर्डर घेऊन ते विक्रीही केले होते. या उद्योगामुळे हे आवरगंड कुटुंबीय प्रसिद्धीच्या झोतातही आहे. परिसरातील शेतकऱ्यासाठी हा उद्योग एक आदर्श ठरला आहे.

सर्वप्रथम मिरा आवरगंड आणि स्वाती घोडके यांनी पाहुण्यांना ओंकार उद्योगातील आंब्याचे लोणचे कसे बनवतात यावर सविस्तर माहिती दिली. या शिवाय आंब्याचे लोणचे बनविल्यानंतर राहिलेल्या कोईचे सुद्धा रुचकर अशी सुपारी बनविली जाते. तसेच रब्बी हंगामातील वाळकाच्या ऊसऱ्या हे सुद्धा उत्पादन लोकप्रिय होत आहे. ही संपूर्ण माहिती आवरगंड कुटंबीयांनी वरील पाहुण्यांना दिली. रुपाली गावडे यांनी इतर शेतकऱ्यानी सुद्धा आवरगंड कुटुंबीयांचा आदर्श घेऊन असेच असेच ग्रामीण भागात शेतकऱ्यानी उद्योग उभारल्यास कुणावरही आत्महत्येची वेळ येणार नाही, सांगीतले. क्रांती काळे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. वाळकाच्या ऊसऱ्या ही लोप पावत चाललेली भाजी व अन्य रानभाज्याचे महत्व ओळखून इतरानीही  असे प्रयत्न करायला हवेत, असे  क्रांती काळे म्हणाल्या. दुपारपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत   शेतातील विविध उत्पादने पाहुन त्यांनीही काही सुचना केल्या व आनंद व्यक्त केला. शेवटी भाजीपाला उत्पादक ग्रुप परभणीच्या वतीने व आवरंगड परिवाराच्या वतीने त्यांना लोणचे, ऊसऱ्या, सुपारी आदी उत्पादने देऊन त्यांचा योग्य तो सन्मान केला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या