🌟सामाजिक कार्यकर्ते नागेश एंगडेंनी वाढदिवसा निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करीत दिला सामाजिक एकात्मतेचा संदेश...!


🌟पुर्णेतील जामा मस्जिद येथे करण्यात आले होते मुस्लिम बांधवांसाठी भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन🌟 


पुर्णा (दि.०९ एप्रिल) - पुर्णा शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते नागेश एंगडे यांनी पवित्र रमजान महिना सुरू असल्याने त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काल सोमवार दि.०८ एप्रिल २०२४ रोजी शहरातील मुस्लिम बांधवांसह हितचिंतक मित्र परिवारासाठी जामा मस्जिद येथे भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करीत तमाम पुर्णेकरांना सामाजिक/राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.


यावेळी नागोराव घुले,श्रीकांत हिवाळे सर,मा.नगरसेवक मगदूम खुरेशी,मा.नगरसेवक चांद साहाब बागवान, सामाजिक कार्यकर्ते रौऊफ बागवान,समाजसेवक राजू नारायणकर बंडू मोरे,चंद्रकांत भवरे,यशवंत पाटिल, साहेबराव सोनवणे,सुमित रिंगणमोडे,सचिन पाटील सर,गिरीष एगंडे,,छोटू रिंगणमोडे, आतुल गवळी बाळू गायकवाड,आनंद बनसोडे,अविनाश पाटील, राहुल आनदे,पिंटू कांबळे,निलेश बारहाटे, हर्षु एगंडे, बंटी एगंडे, कुणाल भवरे,गोविंद लोंढे, नारायण गायकवाड, दीपक गवळी,वहिद कुरेशी,सादिक कुरेशी,जुबेर कुरेशी,जुनेद कादरी आदीं मुस्लिम समाज बांधव मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता....

* नागेश एंगडे यांनी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याना केले विनम्र अभिवादन :-

सामाजिक कार्यकर्ते नागेश एंगडे यांनी वाढदिवसा निमित्त प्रथमतः शहरातील शिवतीर्थावरील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील महामानव बोधीसत्व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या पुर्णाकृती पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच महात्मा बसवेश्वर चौकातील महात्मा बसवेश्वर यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागेवरील महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस देखील पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

* सामाजिक कार्यकर्ते नागेश एंगडे यांचे वाढदिवसा निमित्त शहरातील बौद्ध विहारात वंदन :-


सामाजिक कार्यकर्ते नागेश एंगडे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील बौद्ध विहारात वंदन केले यावेळी त्यांनी पुज्य भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांना चिवरदान करुन भिख्खू संघाला फळदान करुन त्यांचे आशिर्वाद घेतले यावेळी समाज बांधव मित्र परिवार तसेच हितचिंतकांनी त्यांचा वाढदिवस साजरा करत त्यांना वाढदिवसाच्या हृदयस्पर्शी शुभेच्छा दिल्या....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या