🌟परभणी लोकसभा मतदार संघाच्या निवडणूकीसाठी मतदार यंत्राची द्वितीय सरमिसळ....!


🌟परभणी लोकसभा मतदार संघातील 2,290 मतदान केंद्रासाठी 2,866 मतदान यंत्र🌟

परभणी (दि.16 एप्रिल) - परभणी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीकरिता मतदार संघातील एकुण 2,290 मतदान केंद्रावर वितरीत करावयाच्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट अशा एकुण 2,866 मतदान यंत्राची द्वितीय सरमिसळ (रॅण्डमायझेशन) प्रक्रिया निवडणूक निरीक्षक कृष्णकुमार निराला, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत मंगळवार दि.16 एप्रिल रोजी  करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडलेल्या सरमिसळ प्रक्रियेच्या वेळी 17-परभणी लोकसभा मतदार संघाचे निवडणुक निरीक्षक कृष्णकुमार निराला, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट व्यवस्थापन कक्षाचे नोडल अधिकारी गोविंद रणवीरकर, जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी सुनिल पोटेकर, नायब तहसीलदार सतिश रेड्डी यांच्यासह राजकीय पक्षाचे प्रतिनिधी ज्ञानोबा ताटे, अनंता दिपके, अशोक कऱ्हाळे पाटील, डॉ. विवेक नावंदर, अकुंश विष्णुपंत आणि रमेश किशन गिरी आदी उपस्थित होते.राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी आणि उमेदवाराचे प्रतिनिधी समक्ष पार पडलेल्या द्वितीय सरमिसळ प्रक्रियेनुसार 17 परभणी लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदार संघात कोणत्या क्रमांकाचे ईव्हीएम मशिन कोणत्या मतदान केंद्रावर जाणार याची निश्‍चिती झाली. 

यामुध्ये 95 जिंतूर लोकसभा मतदार संघात 424 मतदान केंद्र असून यासाठी  1,526 बॅलेट युनिट (बीयू), 508 कंट्रोल युनीट (सीयू) आणि 551 व्हीव्हीपॅट उपलब्ध झाल्या आहेत. तर 96 परभणी लोकसभा मतदार संघातील 333 मतदान केंद्रासाठी 1,199 बॅलेट युनिट (बीयू), 392 कंट्रोल युनीट (सीयू) आणि 425 व्हीव्हीपॅट उपलब्ध झाल्या आहेत. 97 गंगाखेड लोकसभा मतदार संघातील 432 मतदान केंद्रासाठी 1,555 बॅलेट युनिट (बीयू), 518 कंट्रोल युनीट (सीयू) आणि 561 व्हीव्हीपॅट उपलब्ध झाल्या आहेत. 98 पाथरी लोकसभा मतदार संघातील 398 मतदान केंद्रासाठी 1,433 बॅलेट युनिट (बीयू), 477 कंट्रोल युनीट (सीयू) आणि 517 व्हीव्हीपॅट उपलब्ध झाल्या आहेत. 99 परतूर लोकसभा मतदार संघातील 350 मतदान केंद्रासाठी 1,260 बॅलेट युनिट (बीयू), 484 कंट्रोल युनीट (सीयू) आणि 505 व्हीव्हीपॅट उपलब्ध झाल्या आहेत. आणि 100 घनसावंगी लोकसभा मतदार संघातील 353 मतदान केंद्रासाठी 1,269 बॅलेट युनिट (बीयू), 487 कंट्रोल युनीट (सीयू) आणि 508 व्हीव्हीपॅट उपलब्ध झाल्या आहेत. याप्रकारे 17-परभणी लोकसभा मतदार संघातील 2,290 मतदान केंद्रासाठी अतिरिक्त मतदान यंत्रासह एकुण  8,242 बॅलेट युनिट (बीयू), 2,866 कंट्रोल युनीट (सीयू) आणि 3,067 व्हीव्हीपॅट उपलब्ध झाल्या आहेत.

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या