🌟धम्म कार्याला समर्पितपणे वाहून घेतलेलं आदर्श दाम्पत्य रेखाताई व आदरणीय सुभाष मोरे.....!


🌟उभयतांचे जीवन आणि कार्य समस्त मानव जातीसमोर प्रेरणादायी स्फूर्तीदायक व दिशादर्शक अशा स्वरूपाचे आहे🌟

एमआयडीसी एरिया कुंबेफळ संभाजीनगर येथील आंबेडकरी व धम्म चळवळीतील एक आदर्श दांपत्य म्हणून ज्येष्ठ धम्म उपासिका रेखाताई व आदरणीय सुभाष मोरे या दाम्पत्याकडे बघितले जाते उभयतांचे जीवन आणि कार्य समस्त मानव जातीसमोर प्रेरणादायी स्फूर्तीदायक व दिशादर्शक अशा स्वरूपाचे आहे. 

महामानव तथागत भगवान बुद्ध रयतेचे आदर्श राज्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक सामाजिक समतेचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार या देशामधील कोट्यावधी उपेक्षित शोषित पीडित त कष्टकरी शेतकरी वंचित दलित बहुजन व तमाम स्त्री वर्गाचे मुक्ती दाते व भारत देशाचे भाग्यविधाते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि या महापुरुषांना समर्थ साथ देणाऱ्या माता महामाया माता यशोधरा राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई माता रमाई माता भिमाई हे त्यांचे सर्वोच्च आदर्श या महापुरुषांच्या महानायीकांच्या मानव मुक्तीच्या कार्याचा महान आदर्श डोळ्यासमोर ठेऊन मोरे दाम्पत्य जीवनामध्ये वाटचाल करत आहेत. 

बुद्ध धम्म प्रति त्यांचे आघाद श्रद्धा उभयतांच्या पूज्य आई-वडिलांनी त्यांच्यावर या महापुरुषांचे संस्कार अगदी बाल वयात टाकले असं म्हटलं जातं संस्कारातून घडतो माणूस या वचनाप्रमाणे त्यांच्या विचाराची जडणघडण झाली सुभाष मोरे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दिव्य संदेश शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षण विषयक विचार अंगीकारून अतिशय प्रतिकूल परिस्थिती मधून आपलं शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. 

अगदी बालवयापासून त्यांना अभिनयाची व नाटकाची आवड त्यामुळे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर या ठिकाणी नाट्यशास्त्र विभागाची पदवी परीक्षा प्राविण्‍यामध्ये उत्तीर्ण होऊन आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर अनेक नाटकांमध्ये दर्जेदार भूमिका साकारली त्यांचे स्वलिखित नाटक यस सर हे नाटक प्रेक्षक व नाट्यरसिकांना खूप भावले. विचाराला कृतीची जोड दिल्यानंतर जीवन कसं सर्वांग सुंदर होतं या बाबीच मूर्ती मंत प्रतीक म्हणून धम्म उपासिका रेखाताई व आदरणीय सुभाषराव यांच्याकडे बघितल्या जात सुभाषराव हे एमआयडीसी कुंबेफळ परिसरामध्ये एका वायनरी फॅक्टरी मध्ये नोकरीस आहेत ज्या कारखान्यांमध्ये मध्य निर्मिती होते आणि ज्या कारखान्यांमध्ये ते कामास आहे परंतु आत्तापर्यंत त्यांनी स्वतःला व्यसनापासून व विकारापासून कोसो दूर ठेवल आहे.

महामानव तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रज्ञाशील करुणाnशील सदाचार हे विचार त्यांनी आचरणात आणून स्वतःला व परिवाराला धम्म मार्गावर आरूढ केले आहे कुंभेफळ या ठिकाणी संघमित्रा बुद्ध विहार येथे धम्म प्रचार व प्रसाराचं कार्य हे दाम्पत्य समर्पित भावनेने करत असतात रेखाताई ह्या विप्पसी साधिका आहेत. जागतिक दर्जाचे विपसणा केंद्र इगतपुरी येथून त्यांनी विपसना शिबिर यशस्वीपणे पूर्ण केले सुभाषराव यांनी थायलंड येथे जाऊन तेथील बुद्ध धम्म जाणून घेतला बुद्ध धम्म दर्शन सहल त्यांनी सहपरिवार पूर्ण केली.

जगा मध्ये बुद्ध धम्म सर्व श्रेष्ठ आहे याची प्रचिती त्यांना धम्म सहलीत आली.त्यांनी काया वाचा मनाने समर्पित भावनेने धम्म कार्याला वाहून घेतले आहे.त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संघमित्रा बुद्ध विहारात धम्म प्रबोधनाचे सातत्य पूर्ण सुरू असतात दिनांक १ मे हा त्यांचा वाढ दिवस या मंगल प्रसंगी त्यांना व परिवाराला हार्दिक शुभेच्छा....

 लेखक:- श्रीकांत हिवाळे सर

मा.तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महा सभा पूर्णा जि परभणी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या