🌟परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक : निवडणूक निरीक्षक (सामान्य) कृष्णकुमार निराला यांची नियुक्ती....!


🌟निवडणूक कालावधीत श्री.निराला यांचा मुक्काम सावली शासकीय विश्रामगृह वसमत रोड परभणी येथे असणार🌟 

परभणी (दि.4 एप्रिल) : भारत निवडणूक आयोगाने 17- परभणी लोकसभा मतदार संघासाठी गुजरात केडरचे श्री. कृष्णकुमार निराला (भा.प्र.से.) यांची निवडणूक निरीक्षक (सामान्य) म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांचे बुधवारी सायंकाळी परभणी येथे आगमन झाले आहे. मतदार किंवा राजकीय पक्ष, उमेदवार यांना निवडणूक निरिक्षक श्री. निराला यांच्याशी संपर्क साधण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 8483058717  या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

निवडणूक कालावधीत श्री. निराला यांचा मुक्काम सावली शासकीय विश्रामगृह, वसमत रोड, परभणी, येथे असणार आहे. विभागीय वन अधिकारी श्री. राजेंद्र नाले, भ्रमणध्वनी क्रमांक 94238 61363 यांची निवडणुक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हा निवडणूक यंत्रणेने कळविले आहे......

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या