🌟जालना येथील गजानन तौर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांनी अमृतसर येथून घेतला ताब्यात....!


🌟मुख्य आरोपी विलास पवारला दि.०८ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी🌟

जालना (दि.०५ एप्रिल) - मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या जालना येथील गजानन तौर या तरुणाच्या निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विलास देविदास पवार याचा शोध घेण्यात अखेर जालना जिल्हा पोलिस दलाला यश आले असून त्याला पंजाब राज्यातील अमृतसर येथून जालना पोलिस दलाच्या पथकाने दि.०३ एप्रिल २०२४ रोजी ताब्यात घेतले या निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला विलास पवार हा आरोपी मागील जवळपास चार/पाच महिन्यांपासून पोलीसांनी हुलकावणी देत फिरत होता त्याला पंजाब राज्यातील अमृतसर येथून ताब्यात घेऊन जालन्यात आणल्यानंतर पोलीसांनी काल गुरुवार दि.०४ एप्रिल २०२४ रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दि.०८ एप्रिल २०२४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून विलास पवार याचा शोध घेण्यासाठी जालना पोलिसांचे पथक जवळपास पंधरा दिवसांपासून विविध राज्यांमध्ये फिरत होते परंतु तो वारंवार आपले ठिकाण बदलत पोलिसांना हुलकावणी देत असल्यामुळे त्याच्या मागावर असलेल्या पोलीस पथकाला जवळपास दहा हजार किलोमीटरहून अधिक प्रवास करावा लागला व शेवटी पोलिस पथकाने त्याला बेड्या ठोकण्यात यश मिळवले.


जालन्यासह विविध ठिकाणी अनेक गुन्हे आरोपी असलेल्या गजानन तौर या युवकाची जालना शहरातील मंठा चौक परिसरात दि.११ डिसेंबर २०२३ रोजी भर दिवसा दुपारी ०२-०० वाजेच्या सुमारास गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती या हत्या प्रकरणातील आरोपींपैकी भागवत विष्णू डोंगरे, लक्ष्मण किसन गोरे, रोहित नरेंद्र ताटीपामुलवार या तिघांना यापूर्वीच जालना पोलिसांनी अटक केलेली आहे गजानन तौर याच्या हत्ये प्रकरणी तालुका पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली होती या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी विलास पवार हा कर्नाटक राज्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक कर्नाटक राज्यातील बिदर येथे गेले. पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचण्या अगोदरच तो फरार झाला होता. त्यानंतर तो राजस्थान व पंजाब येथे असल्याची माहिती जालना पोलिसांना मिळाली पोलिसांनी या ठिकाणी देखील त्याचा तपास केला परंतु तो सातत्याने आपली ठिकाण बदलत असल्यामुळे पोलिसांच्या हाती लागत नव्हता शेवटी आरोपी विलास पवार हा ज्या विश्वासू माणसांच्या संपर्कात होता त्यांनाच पोलिसांनी ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता आरोपी पंजाब राज्यातील अमृतसर येथेच असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पंजाब पोलिसांच्या मदतीने या आरोपीला पकडले आरोपी वारंवार आपल्या नावासह ठिकाण बदलून राहत होता.

गजानन तौर हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या विलास पवार याच्यावर आत्तापर्यंत तब्बल ०९ ठिकाणी गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये जालना तालुक्यात जालना शेवली,जालना जिल्ह्यातील घनसावंगी तसेच पंजाब राज्यातील अमृतसर येथे देखील त्याच्यावर एक गुन्हा दाखल असून नांदेड जिल्ह्यात त्यांच्यावर जवळपास ०५ गुन्हे दाखल असून त्याच्यावर एकूण ०९ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत कुख्यात आरोपी विलास पवारला पकडण्यासाठी गेलेल्या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक के.ए.वनवे,विलास आटोळे,शमुवेल कांबळे, सचिन चौधरी, लक्ष्मण शिंदे ,चंद्रकांत माळी, रामेश्वर कुऱ्हाडे,सागर बाविस्कर,आदींचा समावेश होता..... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या