🌟पुर्णा पोलीस प्रशासनाच्या वतीने जातीय सलोखा कार्यक्रमा अंतर्गत आज दि.१० एप्रिल रोजी रोजा ईफ्तार पार्टीचे आयोजन...!


🌟शहरातील जामा मस्जिद येथे सायं.०६-०० वाजता इफ्तार पार्टीचे आयोजन🌟

पुर्णा (दि.१० एप्रिल) - पुर्णा पोलीस प्रशासनाच्या वतीने जातीय सलोखा कार्यक्रमा अंतर्गत पवित्र रमजान महिन्या निमित्त आज बुधवार दि.१० एप्रिल रोजी सायंकाळी ०६-०० वाजेच्या सुमारास येथील जामा मस्जिद येथे मुस्लिम बांधवासाठी रोजा ईफ्तार पार्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पुर्णा पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक विलासजी गोबाळे यांच्या वतीने आयोजित या रोजा इफ्तार पार्टी कार्यक्रमास मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्तित राहावे असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे सामाजिक बांधिलकी जोपासत जातीय सलोखा निर्माण व्हावा या उद्देशाने सदरील रोजा इफ्तार पार्टी कार्यक्रमाचे आयोजन पुर्णा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विलासजी गोबाळे यांच्या वतीने करण्यात आले आहे......टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या