🌟वाशिमच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी मतदान जनजागृतीबद्दल केले एनसीसी विद्यार्थ्यांचे कौतूक....!


🌟रॅलीदरम्यान एनसीसी अधिकारी अमोल काळे यांच्या नेतृत्वात एनसीसी विद्यार्थ्यांनी पथनाट्ये सादर केले होते🌟 

✍🏻फुलचंद भगत

वाशिम - देशात लोकशाहीच्या सर्वात मोठया उत्सवात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी शासन प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून जनजागृतीत ‘एक पाऊल पुढे’ असणार्‍या स्थानिक श्री बाकलीवाल विद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) च्या विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी कौतूक केले.

मतदान जनजागृतीसाठी २३ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने मानवी साखळी व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीदरम्यान एनसीसी अधिकारी अमोल काळे यांच्या नेतृत्वात एनसीसी विद्यार्थ्यांनी शहरातील विविध चौकात पथनाट्य सादर करुन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. ‘मतदारराजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी रिसोड नाका, नालसाहबपुरा, शिवाजी महाराज चौक आदी ठिकाणी पथनाट्य सादर केले. यावेळी शिवाजी महाराज चौकात जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, सहाय्यक जिल्हाधिकारी अपुर्वा बासुर, स्विपचे नोडल अधिकारी जिवन आढाव उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले. या जनजागृतीमध्ये ६२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सर्व विद्यार्थ्यांचे बाकलीवाल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेंद्रकुमार बाकलीवाल, शाळेचे मुख्याध्यापक बबनराव बिल्लारी, उपमुख्याध्यापक दंभीवाल, पर्यवेक्षिका सौ. भोंडे, एनसीसी अधिकारी अमोल काळे यांनी कौतुक केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या