🌟महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी आपला उमेदवारी अर्ज आज सोमवार दि.०१ एप्रिल रोजी केला दाखल....!


🌟उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी महायुतीचे उमेदवार जानकर यांच्या सोबत महायुतीचे चार नेते उपस्थित होते🌟

परभणी (दि.०१ एप्रिल) - शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी कॉंग्रेस-राष्ट्रीय समाज पक्ष आदींसह मित्रपक्षांच्या महायुतीचे परभणी लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार महादेव जानकर यांनी आज सोमवार दि.०१ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय समाज पक्षाचे एकमेव आमदार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.रत्नाकर गुट्टे उपस्थित नसल्याने चर्चा कुचर्चांना उद्यान आले होते

दरम्यान महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाताना त्यांच्यासमवेत भाजपचे नेते तथा माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर,भाजपा आमदार मेघना बोर्डीकर,माजी आमदार मोहन फड,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर,माजी खा.सुरेश जाधव,माजी आमदार रामराव वडकुते,भाजपचे जेष्ठ नेते विजय वरपूडकर, जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे,आनंद भरोसे,राजेश देशमुख, बापू घडामोडे,दिलीप थोरात,प्रमोद वाकोडकर, भाजपचे लोकसभा सह समन्वयक डॉ.केदार खटींग,बाळासाहेब जाधव, स्वराजसिंह परिवार आदी महायुतीचे नेते उपस्थित होते.श्री.जानकर यांनी आपला उमेदवारी अर्ज जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे सादर केला. यावेळी आ.लोणीकर,आ.बोर्डीकर, माजी खा.जाधव आणि विटेकर हे चार नेते महायुतीतील घटक पक्षांचे प्रतिनिधी म्हणून हजर होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या