🌟वाशिम जिल्हा पंचायत विकास निर्देशांकामध्ये अव्वल.....!


🌟विस्तार अधिकारी व गट विकास अधिकारी यांचा सत्कार🌟

फुलचंद भगत

वाशिम:-पंचायत विकास निर्देशांकामध्ये (पीडिआय) वाशिम जिल्ह्याला राज्य स्तरावर प्रथम क्रमांकावर आणण्यास सहाय्यक ठरणारे मंगरूळपीर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी भाऊराव अजाबराव बेलखेडकर यांच्यासह तीन गट विकास अधिकारी यांचा सत्कार मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी केला ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या सभेचं जिल्हा परिषद प्रांगणामध्ये नुकतेच आयोजन करण्यात आले होते त्यादरम्यान हा छोटेखानी सत्कार समारंभ पार पडला. पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

विस्तार अधिकारी बेलखेडकर यांनी पंचायत विकास निर्देशांक मध्ये वाढ होण्याकरिता यशदा मध्ये प्रशिक्षण घेऊन वाशिम जिल्ह्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण दिले होते. या प्रशिक्षणामुळे पंचायत विकास निर्देशांकामध्ये (पीडिआय) वाशिम जिल्हा प्रथम क्रमांकावर आला. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन वाशिम जिल्हा परिषदेचे सिईओ वाघमारे यांनी त्यांचा सत्कार केला.

तसेच कारंजा पंचायत समितीमध्ये पंचायत विकास निर्देशांकांचे काम सर्वात आधी पूर्ण केल्यामुळे तेथील गटविकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड आणि मालेगाव तालुक्यातील पंचायत विकास निर्देशांक बाबतचे काम कमी वेळात पूर्ण केल्यामुळे गट विकास अधिकारी बाळकृष्ण अवगण यांचाही सीईओ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रिसोड पंचायत समितीचा पदभार घेण्यापूर्वी कमी असलेले विहिरीचे काम प्रमोद बदरके यांनी 99 टक्क्यापर्यंत नेल्यामुळे त्यांचाही सत्कार मुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आला.ग्रामपंचायतींनी केलेल्या कामांची नोंद ऑनलाइन पद्धतीने 'पंचायत विकास सूचकांक' या संकेतस्थळावर सादर करण्यात राज्यात वाशिम जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातील ४९१ पैकी ४९१ ग्रामपंचायतींच्या ऑनलाइन कामगिरीमुळे राज्यात वाशिम जिल्हा परिषदेचे नाव उंचावले आहे.

पंचायत विकास निर्देशांक (पीडीआय) हा एक बहु-डोमेन आणि बहु-क्षेत्रीय निर्देशांक आहे. या निर्देशांकाचा उपयोग हा पंचायतींच्या सर्वांगीण विकास, कामगिरी आणि प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी केला जातो. पंचायत विकास निर्देशांक हा ग्रामपंचायतींच्या अधिकारक्षेत्रातील स्थानिक समुदायांच्या कल्याण आणि विकासाची स्थिती मोजण्यासाठी विविध सामाजिक-आर्थिक निर्देशक आणि पॅरामीटर्स विचारात घेतो. जिल्ह्यात ४९१ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींना ऑनलाइनची जोड देण्यात आली. ग्रामपंचायत स्तरावर झालेली सर्व कामे व उपलब्ध सुविधांचा डाटा ऑनलाइन पद्धतीने 'पंचायत विकास सूचकांक' या संकेतस्थळावर सादर करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक ग्रामपंचायतींनी या संकेतस्थळावर डाटा सादर करण्याबाबत जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांनी

गटविकास अधिकाऱ्यांकडून वारंवार आढावा घेतला होता. ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी यांनी तत्परता दाखवुन केलेल्या कामाचा डेटा संकेतस्थळावर ऑनलाईन केल्यामुळे पंचायत विकास निर्देशांकामध्ये वाशिम जिल्हा अव्वल ठरला आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या