🌟वाशिम जिल्ह्यात 811 वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांचे गृह मतदान....!


🌟या गृह मतदानासाठी निवडणूक विभागाचे अधिकारी,कर्मचारी अश्या मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदान करून घेताहेत🌟

फुलचंद भगत

वाशिम:-लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच 85 वर्षा पेक्षा जास्त वय असलेले वृद्ध आणि दिव्यांग मतदारांना घरून मतदान करता यावे यासाठी वाशिम जिल्ह्यातील यवतमाळ - वाशिम आणि अकोला लोकसभेसाठी ही मतदान प्रक्रिया सुरू झाली असून रिसोड विधासभा मतदार संघात 289 वयोवृद्ध आणि 93 दिव्यांग असे एकूण 383 मतदारांचे तर कारंजा विधानसभा मतदार संघात 85 वर्षांवरील वयोवृद्ध 266 तर दिव्यांग 162 असे एकुण 428 मतदारांचे गृह मतदान पार पडले.वाशिम विधानसभा मतदार संघात ही प्रक्रिया 19 आणि 20 एप्रिल ला होणार आहे.

या गृह मतदानासाठी निवडणूक विभागाचे अधिकारी, कर्मचारी अश्या मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदान करून घेताहेत.यामुळे वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या