🌟परभणी लोकसभा मतदार संघातील उमेदवारांना नामनिर्देशन अर्ज मागे घेण्यासाठी 8 एप्रिल शेवटची मुदत......!


🌟उमेदवारांना सोमवार दि.08 एप्रिल पर्यंत अर्ज मागे घेता येणार🌟

परभणी (दि.6 एप्रिल) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 17-परभणी लोकसभा मतदार संघ निवडणुकीसाठी 42 उमेदवारांनी 65 नामनिर्देशन अर्ज दाखल केले. परंतू काल दि. 5 एप्रिल रोजी पार पडलेल्या छाननी प्रक्रियेत एका उमेदवारांचा अर्ज अवैध ठरल्याने आता एकुण निवडणूकीच्या रिंगणात 41 उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज वैध ठरले आहेत.

अर्ज मागे घेण्याच्या दुसऱ्या दिवशी एकाही उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतलेला नाही. उमेदवारांना आपले नामनिर्देशन अर्ज मागे घेण्यासाठी सोमवार, दि. 8 एप्रिल, 2024 रोजी दूपारी 3:00 वाजेपर्यंत शेवटची मुदत आहे. शुक्रवार, दि. 26 एप्रिल रोजी 17-परभणी लोकसभा मतदार संघासाठी मतदान होणार असुन इच्छुक उमेदवारांना दि. 8 एप्रिल पर्यंत आपले अर्ज मागे घेता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघूनाथ गावडे यांनी दिली आहे.......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या