🌟परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक : परभणी लोकसभेसाठी एकूण 42 उमेदवारांचे 65 अर्ज दाखल...!


🌟अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघूनाथ गावडे यांनी दिली🌟 


परभणी : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने 17-परभणी लोकसभा मतदार संघ निवडणुकीसाठी एकुण 42 उमेदवारांनी 65 नामनिर्देशन अर्ज दाखल केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघूनाथ गावडे यांनी दिली आहे.

17-परभणी लोकसभा मतदार संघासाठी दि. 28 मार्च ते दि. 4 एप्रिल या नामनिर्देशन सादर करण्याच्या कालावधीत अनिल माणिकराव मुदगलकर (अपक्ष) यांनी एक नामनिर्दिशन अर्ज दाखल केला आहे. तर कृष्णा त्रिंबकराव पवार (न्यु राष्ट्रीय समाज पार्टी) चार अर्ज, गोविंद रामराव देशमुख (अपक्ष) चार अर्ज, जानकर महादेव जगन्नाथ (राष्ट्रीय समाज पक्ष) चार अर्ज, आप्पासाहेब ओंकार कदम (अपक्ष) दोन अर्ज, बोबडे सखाराम ग्यानबा (अपक्ष) चार अर्ज, जाधव संजय (बंडू) हरिभाऊ (शिवसेना)-(उध्दव बाळासाहेब ठाकरे) तीन अर्ज, मुस्तफा मैनोदीन शेख (अपक्ष) एक अर्ज, राजन रामचंद्र क्षीरसागर (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया) दोन अर्ज, विजय अण्णासाहेब ठोंबरे (अपक्ष) एक अर्ज, विष्णुदास शिवाजी भोसले (अपक्ष) एक अर्ज, विनोद छगनराव अंभोरे (बहुजन मुक्ती पार्टी) एक अर्ज, किशोर राधाकिशन ढगे (स्वाभीमानी पक्ष) दोन अर्ज, गणपत देवराव भिसे (अपक्ष) एक अर्ज, शेख सलीम शेख इब्राहीम (ऑल इंडिया मजलीस-ए-इन्कीलाब-ए-मिल्लत) दोन अर्ज, संगीता व्यंकटराव गिरी (स्वराज्य शक्ती सेना) एक अर्ज, विठ्ठल भुजंगराव तळेकर (अपक्ष) एक अर्ज, कांबळे शिवाजी देवजी (अपक्ष) एक अर्ज, कौसडीकर निहाल अहमद (ऑल इंडिया मजलीस ए-इन्कीलाब-ए-मिल्लत) एक अर्ज, सम‍िरराव गणेशराव दूधगावकर (अपक्ष) दोन अर्ज, अर्जून ज्ञानोबा भिसे (अपक्ष) एक अर्ज, ॲड. डॉ. यशवंत रामभाऊ कसबे (भारतीय जन विकास आघाडी) एक अर्ज, राजेंद्र अटकल (अपक्ष) एक अर्ज, सय्यद इर्शाद अली (सोशल डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडीया) एक अर्ज, जयश्री उद्धव जाधव (बहुजन समाज पार्टी (आंबेडकर) एक अर्ज, नारायण तुकाराम चव्हाण (अपक्ष) एक अर्ज, राजाभाऊ शेषराव काकडे (अपक्ष) एक अर्ज, ज्ञानेश्वर जगन्नाथ दहिभाते (अपक्ष) एक अर्ज, कैलास बळीराम पवार (बळीराजा पार्टी) एक अर्ज, बाबासाहेब भुजंगराव उगले (वंचित बहुजन आघाडी) एक अर्ज, सुभाष दत्तराव जावळे (अपक्ष) दोन अर्ज, किशोरकुमार प्रकाश शिंदे (अपक्ष) एक अर्ज, आलमगीर मोहम्मद खान (बहुजन समाज पार्टी) एक अर्ज, डॉ. गोवर्धन भिवाजी खंडागळे (बहुजन भारत पार्टी) एक अर्ज, पंजाब उत्तमराव डख (वंचित बहुजन आघाडी) दोन अर्ज, हरिभाऊ चांदोजी शेळके (ओबीसी बहुजन पक्ष) एक अर्ज, कारभारी कुंडलीक मिथे (अपक्ष) एक अर्ज, श्रीराम बन्सीलाल जाधव (जय सेवालाल बहुजन विकास पार्टी) एक अर्ज, सय्यद अब्दुल सत्तार (आंबेडकर समाज पार्टी) एक अर्ज, अर्चना दिनकर गायकवाड (अपक्ष) एक अर्ज, दशरथ प्रभाकर राठोड (महाराष्ट्र विकास आघाडी) एक अर्ज आणि विलास तांगडे (अपक्ष) तीन अर्ज नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत.

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे यांनी उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल करुन घेतले. शुक्रवार, दि. 5 एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येणार असून, सोमवार, दि. 8 एप्रिल, 2024 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहे. तर शुक्रवार, दि. 26 एप्रिल रोजी 17-परभणी लोकसभा मतदार संघासाठी मतदान होणार आहे. या निवडणूकीचा निकाल मंगळवार दि. 4 जून रोजी लागणार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या