🌟दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागीय प्रशासनाने नांदेड-पनवेल-नांदेड विशेष गाडीच्या 40 फेर्‍या केल्या मंजूर....!


🌟अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड येथील जनसंपर्क विभागाने दिली आहे🌟

नांदेड (दि.18 एप्रिल) : दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागीय प्रशासनाने उन्हाळी सुट्यात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून परभणी,जालना,औरंगाबाद,कल्याण मार्गे नांदेड-पनवेल-नांदेड विशेष गाडीच्या 40 फेर्‍या मंजूर केल्या आहेत.

              नांदेड-पनवेल व पनवेल-नांदेड  द्वि-साप्ताहिक विशेष गाडीच्या प्रत्येकी 20 फेर्‍या होणार आहेत. त्यामध्ये गाडी क्रमांक 07625 हुजूर साहिब नांदेड ते पनवेल विशेष गाडी 22 एप्रिल ते 26 जून दरम्यान दर सोमवारी आणि बुधवारी नांदेड रेल्वे स्थानकावरून रात्री 11 वाजता सुटेल  आणि परभणी, मानवत, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, लासुर, रोटेगाव, नगरसोल, अंकाई, इगतपुरी, कल्याण मार्गे पनवेल येथे दुसर्‍या दिवशी दुपारी 12.40 वाजता पोहोचेल. ही गाडी एप्रिल, मे आणि जून महिन्यात मिळून 20 फेर्‍या पूर्ण करेल.  तर गाडी क्रमांक 07626 पनवेल ते  हुजूर साहिब नांदेड   विशेष गाडी 23 एप्रिल ते 27 जून दरम्यान दर मंगळवारी आणि गुरुवारी पनवेल रेल्वे स्थानकावरून दुपारी 2.30 वाजता सुटेल  आणि कल्याण, इगतपुरी, अंकाई, नगरसोल, रोटेगाव, लासुर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत, परभणी मार्गे हुजूर साहिब नांदेड  येथे दुसर्‍या दिवशी सकाळी 04.30 वाजता पोहोचेल. ही गाडी एप्रिल, मे आणि जून महिन्यात मिळून 20 फेर्‍या पूर्ण करेल. या गाडीत वातानुकूलित आणि स्लीपर मिळून 22 डब्बे असतील, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड येथील जनसंपर्क विभागाने दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या