🌟हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा येथे विज कंपनीच्या कर्मचाऱ्यास 4 हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले....!


🌟लक्ष्मीकांत बिजलगावे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे🌟

 शिवशंकर निरगुडे - हिंगोली 

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे सोलार पंपांच्या सर्वेक्षणासाठी 4 हजाराची लाच घेतांना विज कंपनीच्या कर्मचाऱ्याला आज दि 03/04/2024 सायंकाळी रंगेहात पकडले आहे लक्ष्मीकांत बिजलगावे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे याबाबत लाचपुत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील एका शेतकऱ्यांस शेतात सोलर पंपाची उभारणी करायची होती त्यासाठी त्यांनी विज वितरण कंपनी कडे रीतसर अर्जही केला होता मात्र त्यासाठी लागणाऱ्या सर्वेक्षणासाठी त्यांनी विज वितरण कंपनीचे  कर्मचारी लक्ष्मीकांत बिजलवार यांच्याकडे पाठपुरावा  सुरू केला होता मात्र लक्ष्मीकांत याने त्यासाठी सहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती मात्र तडजोडीने 4 हजार रुपये देण्याचे ठरले होते सदर रक्कम आज कुरुंदा येथे देण्याचेही ठरले होते

मात्र संबंधित शेतकऱ्याने हिंगोलीच्या लाचलुच प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली होती यावरून उपधिक्षक अनिल कटके पोलिस निरीक्षक विनायक जाधव. प्रफुल्ल अंकुशकर जमादार ज्ञानेश्वर पंचलिंगे .तानाजी मुंडे . रवि वर्णने राजाराम फूफाटे शेख अखबर यांच्या पथकाने आज सायंकाळी कुरुंदा येथील टी पॉईन्टवर सापळा रचला होता ठरल्या प्रमाने लक्ष्मीकांत बिजलवार यांनी चार हजार रुपयांची लाच घेतली यावेळी हिंगोलीच्या लाचलूचपतच्या पथकाने त्यास रंगेहाथ पकडलें या प्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती

हिंगोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना लाचलूचपुत विभागाच्या वतीने अवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम  कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्का व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.....

डॉ.राजकुमार शिंदे ,पोलीस अधीक्षक, 

अँटी करप्शन ब्युरो. नांदेड परिक्षेत्र, नांदेड मोबाईल नंबर - 9623999944

श्री.अनिल कटके, पोलिस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, हिंगोली मोबाईल नंबर - 9870221379 कार्यालय दुरध्वनी - 02456-223055

@ टोल फ्रि क्रं. 1064

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या