🌟परभणी जिल्ह्यात सन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेसाठी कलम 36 लागू.....!


🌟जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी केले आदेश जारी🌟                          

परभणी (दि.06 एप्रिल) : परभणी जिल्ह्यात दि. 11 एप्रिल, 2024 रोजी रमजान ईद, दि. 14 एप्रिल, 2024 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि दि. 17 एप्रिल, 2024 रोजी श्रीराम नवमी हे सण/उत्सव साजरे होणार या पार्श्वभूमीवर पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी जिल्ह्यात कलम 36 लागू केले आहे. उत्सवाच्या कालावधीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरवणुकांचे व इतर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जिल्ह्यात दि. 26 एप्रिल रोजी लोकसभा निवडणूकीची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्याअनुषंगाने राजकीय पक्ष, संघटना प्रसिद्धी मिळविण्याकरिता तसेच वर्चस्व मिळविण्याकरिता या सण उत्सवात प्रयत्नशील राहतात. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरीता परभणी जिल्ह्यात या कालावधीत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी कलम 36 मुंबई पोलिस कायद्यान्वये कलम 33 अन्वये केलेल्या कोणत्याही नियमाचे किंवा आदेशाचे उल्लंघन होणार नाही अशा रितीने दि. 11 ते 30 एप्रिल, 2024 या कालावधीत परभणी जिल्ह्यात सर्व ठाणे स्वाधीन अंमलदार किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुंबई पोलिस कायदा कलम 36 मधील पोट कलम क, ख, ग, ड 1 (डक) (च) प्रमाणे खालील बाबतीत लेखी किंवा तोंडी आदेश आपआपल्या हद्दीत देण्याचे अधिकार प्रदान केले आहेत.

या आदेशात रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणूकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे किंवा त्यांची वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी याविषयी निदेश देणे. तसेच कोणत्याही मिरवणूका कोणत्या मार्गाने व कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढु नयेत असे मार्ग व अशा वेळा विहीत करणे. सर्व मिरवणूकींच्या व जमावांच्या प्रसंगी व उपासणेच्या सर्व जागांच्या आसपास उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्यावरुन किंवा सार्वजनीक जागी किंवा सार्वजनीक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा होऊ न देणे. सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानाच्या, कपडे धुण्याच्या व उतरवण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागांमध्ये, जत्रा, देवळे आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणे. कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ किंवा सार्वजनीक जागेत किंवा जागेजवळ वाद्य वाजविण्याचे किंवा गाणी गाण्याचे किंवा ढोल, ताशे व इतर वाद्य वाजविण्याचे आणि शिंगे व इतर कर्कश वाद्य वाजविण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे. कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी ध्वनीक्षेपकांचा उपयोग करण्याचे विनियमन करत त्यावर नियंत्रण ठेवणे. सक्षम  प्राधिकाऱ्याने या अधिनियमाची कलमे 33, 35, 37 ते 40, 42, 43 व 45 अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्ठी देणारे योग्य आदेश देणे.

या आदेशाद्वारे कोणत्याही इसमाने हा आदेश लागु असेपर्यंत परभणी जिल्ह्यात जाहीरसभा, पदयात्रा इत्यादी कार्यक्रमासंबंधी पोलिस अधिकारी किंवा त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्याकडून तारीख, वेळ, सभेची जागा, मिरवणूकीचा मार्ग त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा निश्चित केल्याशिवाय आयोजित करु नये. तसेच संबंधित पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करावे. जाहीर सभा, मिरवणूका, पदयात्रा, मोर्चा यात संयोजित घोषणा सोडून ज्या घोषणेत शांतता व सुव्यवस्थेस बाधा येवू शकेल अशा घोषण देवू नयेत. हे आदेश लग्नाच्या वरातीस, प्रेत यात्रा व धार्मिक कार्यक्रमास लागू राहणार नाहीत. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीत मुंबई पोलिस कायदा कलम 134 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील असे पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या