🌟कारंजा मतदार संघातील सोमठाना येथील स्थिर सर्वेक्षण पथकाने अवैध 3 लाख 63 हजार रुपयाची वाहतूक पकडली....!


🌟रकमेबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणतेही पुरावे आढळले नाही🌟

फुलचंद भगत

वाशिम:-भारत निवडणूक आयोगाचे आदेशानुसार ३५ कारंजा विधानसभा मतदारसंघ अंतर्गत कारंजा ते यवतमाळ रस्त्यावर सोमठाना येथे स्थिर सर्वेक्षण पथक स्थापन करण्यात आले असून या पथकाने वाहनांची तपासणी करून अवैधरित्या रोख रक्कम, दारू अथवा वाटपासाठी च्या वस्तू आढळून आल्यास याबाबतची माहिती संबंधित शासकीय यंत्रणांना देणे आवश्यक आहे.

                   दिनांक १ एप्रिल २०२४ रोजी तीन ३ वाजून ५० वाजेच्या सुमारास यवतमाळ कडून येणाऱ्या एमएच २९ बीव्ही १८२१ या वाहनाची तपासणी केली.जाकीर उल्ला खान राहणार कारंजा जिल्हा वाशिम व नजीम उल्ला खान आताऊल्ला खान राहणार नेर तालुका जिल्हा यवतमाळ यांच्याजवळ लाल रंगाची कापडी पिशवी मध्ये रोग रक्कम तीन लाख 63 हजार रुपये रक्कम आढळून आली. सदर रकमेबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणताही पुरावे आढळले नाही. सादर रक्कम ए. आर. खान एचपी पेट्रोल पंप यांची वसुली कॅश आहे असे त्यांनी सांगितले आहे. कार्यवाही पथक प्रमुख एस एस मिसाळ व इतर तीन यांनी हि रक्कम जप्त करून पुढील कारवाई करिता सदर रक्कम ठाणेदार श्री प्रवीण खंडारे ग्रामीण पोलीस स्टेशन कारंजा यांच्या ताब्यात देण्यात आली.ऊपरोक्त कार्यवाही जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी वाशिम बुवनेश्वरी एस., सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कैलास देवरे,यांच्या मार्गदर्शनाखाली सोमठाना येथील स्थिर सर्वेक्षण पथकातील स्थिर सर्वेक्षण पथकातील सदस्य प्रथक प्रमुख संतोष मिसाळ, धनंजय चौधरी, संजय राठोड व ASI व्हि. उ. महाकाळ पथकातील कर्मचारी यांनी केली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या