🌟मौजे दुसलगांव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दि.29 एप्रिल रोजी साजरी होणार....!


🌟असे दुसलगावच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमेटीच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे🌟

                लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मा.उपविभागिय पो.अधिकारी श्री.दिलीप टिपरसे व मा.पो.नि.श्री.दिपककुमार वाघमारे यांच्या निदर्शनानुसार दि.24/04/2024 ते 27/04/2024 पर्यंत या काळात निवडणूक कार्यक्रम असल्याने आदर्श आचारसंहिता चा भंग होऊ नये म्हणून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस बंदोबस्तात असल्याने कळविलेले आहे.आमच्या गावचे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मौजे दुसलगांव येथे दि.25/04/2024 नेहमी मोठ्या थाटामाटात साजरी होते.पो.पा.सौ.संगिता कचरे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमेटी तथागत दुसलगावच्या कमीटीला विनंती केली होती.त्यांनी दि.14/04/2024 रोजी कमीटीची बैठक घेऊन विनंती मान्य केली असून दि.25/04/2024 रोजी ची जयंती दि.29/04/2024 रोजी होणार आहे.असे दुसलगावच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमेटी च्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

             29/04/2024 रोजी सकाळी 9 वाजता पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण होणार आहे.मिरवणूक व बाकी कार्यक्रम सायंकाळी होणार आहे.तरी फुले, शाहू आंबेडकर अनुयायी, बौद्ध उपासक,उपासिका यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जयंती कमीटीचे अध्यक्ष गणपती गंगाधर पारवे.व उपसरपंच संभाजी पारवे यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या