🌟पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथे उद्या दि.28 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवाचे आयोजन...!


 🌟या कार्यक्रमासाठी ताडकळस येथिल सरपंच उपसरपंच विविध आजी माजी पदाधिकारी,ग्रामस्थ व महिला उपस्थित राहणार🌟

पुर्णा (दि.27 एप्रिल) - पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथे सार्वजनिक भिमजयंती उत्सव समितीच्या वतीने येथे प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी 28 एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

या निमित्त सकाळी 8:30 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास मुख्य अभिवादन करण्यात येणार आहे.पंचशिल धम्म ध्वजारोहण ताडकळस पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल शेळके यांच्या हस्ते होणार असून साहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन काठेवाडे यांच्या हस्ते निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण होणार आहे.सामुहिक त्रिशरण पंचशिल,भिमस्तूती ग्रहण.आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले यावेळी मुख्य सत्कारमुर्ती डॉ.सिध्दार्थ हत्तीहंबीरे ( प्रदेशाध्यक्ष काॅग्रेस आय अनुसुचित जाती विभाग महाराष्ट्र )यांचा जयंती महोत्सव समितीचे वतीने सत्कार करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी ताडकळस येथिल सरपंच उपसरपंच विविध आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ व महिला उपस्थित राहणार आहेत.

दुपारी 01-00 वाजता गावातील प्रमुख मार्गावरून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक देखाव्यासह काढण्यात येणार आहे.सायकांळी भोजनदान झाल्यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शाहीर विजय सातोरे पुर्णा यांचा प्रबोधनात्मक भिमगींताचा कार्यक्रम होणार आहे.या भिमजयंती कार्यक्रमाला ताडकळस व परिसरातील ग्रामस्थ यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सार्वजनिक भिमजयंती उत्सव समिती ताडकळस यांनी आवाहन केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या