🌟नांदेड सचखंड गुरुद्वारा निवडणूक प्रकरण : जिल्हाधिकारी अभिजित राऊत खंडपीठासमोर हजर राहण्याचे निर्देश....!


🌟उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जिल्हाधिकारी राऊत यांना २६ एप्रिल रोजी खंडपीठासमोर हजर राहण्याचे दिले निर्देश🌟

नांदेड (दि.०८ एप्रिल) - नांदेड येथील पवित्र तिर्थक्षेत्र सचखंड गुरुद्वारा निवडणूक संदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिके संदर्भात सन्माननीय उच्च न्यायालयाने दि.२७ मार्च २०२३ रोजी दिलेल्या आदेशाद्वारे नांदेड येथील सचखंड गुरुद्वाराच्या निवडणुका ०३ महिन्यांच्या कालावधीत घेण्याचे निर्देश दिले होते परंतु सन्माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी सरकारने केली नाही.


नांदेड येथील याचिकाकर्ते जगदीपसिंग मोहनसिंग नंबरदार यांनी या संदर्भात न्यायालयात मूळ रिट याचिका क्रमांक १००५/२०२२ मध्ये अवमान याचिका क्रमांक ५११/२०२३ दाखल केली यावर सन्माननीय न्यायमूर्ती मंगेश पाटील आणि सन्माननीय न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांच्या खंडपीठाने नांदेड गुरुद्वारा बोर्डाच्या निवडणुकीच्या संदर्भात अवमान याचिकेत महसूल आणि वन विभागाच्या मुख्य सचिवांना ५ एप्रिलला खंडपीठासमोर हजर राहण्याचे निर्देश दिले होते मात्र हजर झाल्यानंतरही महसूल आणि वन विभागाच्या मुख्य सचिव अनभिज्ञ होते की सरकारने नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना नांदेड शीख गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजूर साहिबची निवडणूक घेण्याचे निर्देश दिले आहेत की नाही त्यामुळे न्यायालयाने नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना न्यायालयाचा अवमान कायद्यांतर्गत तयार केलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या अपील बाजूचे नियम१९६० च्या प्रकरण XXXIV (फॉर्म क्रमांक I) च्या नियम ०९ अंतर्गत औपचारिक नोटीस बजावली आहे आणि खंडपीठासमोर वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्याचे आदेश दिले अवमान याचिकेवर पुढील सुनावणी २६/०४/२०२४ रोजी आहे, याचिकाकर्त्यातर्फे ॲड.मृगेश नरवाडकर आणि ॲड.वासीफ सलीम शेख हे काम पाहत आहे, तर ॲड.कश्यम अशोक शिंदे यांनी त्यांना सहकार्य केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या