🌟परभणी जिल्ह्यात ड्रोन प्रक्षेपन व ड्रोन वापरावर 19 आणि 20 एप्रिल रोजी मनाई.....!


🌟पंतप्रधानांच्या आगामी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आदेश जारी🌟 

परभणी (दि.19 एप्रिल) : मा.पंतप्रधान,भारत सरकार हे दि. 20 एप्रिल, 2024 रोजी परभणी जिल्हा दौऱ्यावर येणार असून, या दिवशी जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी व ड्रोनव्दारे होणारे नियोजित हल्ले रोखण्यासाठी जिल्ह्याच्या हद्दीत दि. 19 एप्रिल, 2024 रोजीचे 00.01 वाजेपासून ते दि. 20 एप्रिल, 2024 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत विना परवाना व बेकायदेशीरित्या ड्रोन प्रक्षेपण व ड्रोन वापर करण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) प्रमाणे मनाई आदेश पारीत करण्यात आला आहे.

जिल्हादंडाधिकारी रघुनाथ गावडे यांना फौजदारी प्रक्रीया संहीता 1973 चे कलम 144 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन या आदेशाव्दारे असे निर्देश दिले आहे. की मा. पंतप्रधान, भारत सरकार यांच्या आगामी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी व विना परवाना,बेकायदेशीरित्या ड्रोन प्रक्षेपण व ड्रोन वापर करण्यास या आदेशव्दारे प्रतिबंध करण्यात आले आहे.

सदरील आदेश दिनांक 19 एप्रिल, 2024 रोजीचे 00.01 वाजेपासून ते दि.20 एप्रिल, 2024 रोजीचे 24.00 वा. पर्यंत अंमलात राहणार असल्याचे जिल्हादंडाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आदेशात नमूद केले आहे......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या