🌟जिल्हा परिषद शाळेच्या एकाच शिक्षकाची 18 मुले नवोदयच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण....!


🌟साखरा शाळेचे शिक्षक विनोद झनक यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन🌟

फुलचंद भगत

वाशिम:-केंद्र शासनाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या आणि अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परिक्षेत वाशिम येथील भारतरत्न अटल बिहारी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेचे तब्बल 18 विद्यार्थी आणि उकळीपेन व केकत उमरा येथील जि प शाळेचे एकुण 11 विद्यार्थी यशस्वी झाले असल्याची माहिती सुत्राकडुन प्राप्त झाली आहे.

त्याबद्दल सर्व स्तरातुन नवोदयमध्ये यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक होत होत आहे.  विशेषत: मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे आणि शिक्षण व आरोग्य सभापती चक्रधर गोटे यांनी विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या साखरा शाळेचे शिक्षक विनोद झनक आणि उकळीपेन येथील शिक्षक संतोष ईढोळे यांना  भ्रमणध्वनीवर संपर्क साधुन विशेष अभिनंदन केले आहे.

झनक गुरुजी यांचे सारखे  शिक्षक हे वाशिम जिल्ह्याची शान आहेत. जिल्हा परिषदेच्या इतर शिक्षकांनी सुद्धा विनोद झनक, डिगांबर घोडके व संतोष ईढोळे गुरुजींप्रमाणे आपल्या मुलांवर मेहनत घेऊन आपल्या शाळेची जास्तीत जास्त मुले नवोदय मध्ये जातील तसेच  जास्तीत जास्त मुले राष्ट्रीयदृष्ट्या दूर्बल घटकांसाठी घेतली जाणारी एनएमएमएस परीक्षा उत्तीर्ण होतील यासाठी मेहनत घ्यावी, असे आव्हान मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी जिल्हा परिषदेतील इतर सर्व शिक्षकांना केले आहे. साखरा शाळेतील नवोदय परिक्षेची तयारी करण्यास मदत करणाऱ्या विनोद उर्फ राजु महाले आणि एन.एम.एम.एस. परिक्षेची तयारी करण्यास सहकार्य करणाऱ्या संतोष आमले, सरला मुंडे आणि संदिप अवचार यांच्यासह ज्या- ज्या शिक्षकांनी नवोदय परिक्षेसाठी विद्यार्थ्यांची तयारी करुन घेतली त्यांचेही जिल्हा परिषदेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

विनोद झनक गुरुजी आणि संतोष इढोळे गुरुजी यांचे मनःपूर्वक अभिनंदन. आपण वाशिम मधील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता ज्या सेवा देत आहात त्याचा आम्हा सर्वास सार्थ अभिमान आहे. यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपल्या जिल्हा परिषदेतील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक त्यांचे शाळे अंतर्गत येणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये पात्र करणे,  तसेच एन. एम. एम. एस. परीक्षेमध्ये पात्र करण्याकरिता मेहनत घेतील अशी मला आशा वाटते.”

- वैभव वाघमारे (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी 

“नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षे मधे एकुण संख्येच्या ७०% ते ८०% विद्यार्थी हे जि.प.शाळे मधुन पात्र ठरतात ही बाब  अतिशय गौरवास्पद आहे.विद्यार्थ्यांचा सर्वागिंन विकासा करिता आम्ही कटीबध्द आहोत.जि.प.शाळा अधिक गुणवत्ता पूर्ण व सुविधायुक्त करण्या करिता आमचा प्रयत्न आहे.सर्व पात्र विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मनपूर्वक अभिनंदन.” 

- चक्रधर गोटे, सभापती, शिक्षण व आरोग्य

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या