🌟गंगाखेड विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्राध्यक्ष/मतदान अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या प्रशिक्षणाचे 17 एप्रिल रोजी आयोजन....!


🌟प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्यांवर लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 134 नुसार कारवाई - जिवराज डापकर 

परभणी (दि.16 एप्रिल) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने 17- परभणी लोकसभा मतदारसंघातील 97- गंगाखेड विधानसभा मतदार संघात 432 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार असून या करीता नियुक्त सर्व मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे दुसरे प्रशिक्षण दि.17 एप्रिल रोजी संत जनाबाई महाविद्यालय, कोद्री रोड, गंगाखेड या ठिकाणी आयोजीत करण्यात आले आहे.

17-परभणी लोकसभा मतदारसंघ निवडणूकीची मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी दि.17 रोजी आयोजीत केलेल्या प्रशिक्षणास नियुक्त सर्व मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांनी उपस्थित आदेश श्री. डापकर यांनी दिले आहेत. हे प्रशिक्षण हे दोन सत्रात आयोजीत करण्यात आले असून सकाळच्या सत्रात पथक क्र. 1 ते 250 मधील नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे तर दुपारच्या सत्रात पथक क्र. 251 ते 478 नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण होणार आहे. त्यानंतर सर्व झोनल अधिकारी, मास्टर ट्रेनर यांचे कडून सर्व मतदान केंद्र अध्यक्ष व मतदान केंद्र अधिकारी यांना EVM मशीन व्दारे मतदानाचे प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात येणार आहे.

ज्या मतदान केंद्राध्यक्ष/ मतदान अधिकारी यांनी टपाली मतदानाचा पर्याय दिलेला आहे व ज्या नियुक्त अधिकारी/कर्मचारी यांचे मतदान या मतदार संघात आहे त्यांचे करीता प्रशिक्षणाचे ठिकाणी टपाली मतदानासाठी मतदान केंद्राची व्यवस्था केली असून प्रशिक्षणापूर्वी केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना मतदान करता येणार आहे.97-गंगाखेड विधानसभा मतदार संघात लोकसभा निवडणूकीचे सर्वात जास्त मतदान केंद्र असल्याने मोठ्या प्रमाणात अधिकारी/कर्मचारी यांची नियुक्त करण्यात आलेली आहे. त्यामूळे जे नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष व मतदान केंद्र अधिकारी प्रशिक्षणास गैरहजर राहतील त्यांच्यावर लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 134 नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे श्री. डापकर यांनी सांगितले आहे......

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या